loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यातील जंगली हत्तीबाबत चौथ्या दिवशीही आंदोलन सुरु

दोडामार्ग (प्रतिनिधी) - जंगली हत्ती हटाव, पकड मोहीम राबवा, शेतकरी बांधवांना न्याय द्या, दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त करावा, यासाठी सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस तसेच शेतकरी यांनी चौथ्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरू ठेवत आक्रमक भूमिका घेत दोडामार्ग वन कार्यालय उघडण्यास मज्जाव केला. लोकप्रतिनिधी यांनी शेतकरी बांधवांचा केवळ गोड बोलून मतासाठी वापर करून खोटी आश्वासन दिली यामुळे हत्ती संकट आजही कायम आहे. वरीष्ठ वन अधिकारी लक्ष देत नाही त्यामुळे स्थानिक अधिकारी रोषाला सामोरे जात आहे. जर वरिष्ठ अधिकारी यांना काही पडले नाही तर दोडामार्ग वन कार्यालय कशासाठी? असा सवाल प्रविण गवस यांनी उपस्थित करत हत्ती हटाव पकड मोहीम निर्णय होत नाही तोपर्यंत माघे हटणार नाही, कार्यालय उघडण्यास देणार नाही, असा पविञा गुरुवारी घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग वन कार्यालय येथे सोमवारपासून सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस यांनी हत्ती मुक्त दोडामार्ग झाला पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये काजू बागायतदार संघटना संजय देसाई, कळणे भिकेकोनाळ सरपंच, अजित देसाई, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, तुकाराम बर्डे, इतर सहभागी झाले आहेत. दोडामार्ग तालुक्यात सहा हत्ती कळप घाटीवडे परिसरात आहे. तर बारा हत्ती कळप हा कणकुबी जांबोटी परिसरात आहे. दोडामार्ग सीमेपासून २४ किलोमीटर अंतरावर आहे. हा कळप दोडामार्गमध्ये दाखल झाला तर मोठी हानी होण्याची शक्यता आहे. हे प्रविण गवस यांनी दोडामार्ग वन कार्यालय वन क्षेञपाल संभाजी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय बुधवारी सायंकाळी वन विभाग टीम कणकुबी जांबोटी परिसरात गेले असता तेथील वन कर्मचारी यांनी माहिती दिली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

दोडामार्ग वन कार्यालय उघडण्यास केला मज्जाव

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg