loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगूल कधीही वाजण्याची शक्यता

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जिल्हा निवडणुक विभागाने देखील आपली तयारी केली असून २०२५-२६ च्या जिल्हा परिषद निवडणूकीसाठी सुधारित मतदार संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात एकूण ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार असून यामध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. महापालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा राज्यात धुऱळा उडत आहे. पंधरा जानेवारीला यासाठी मतदान होणार असून सोळा जानेवारीला लगेच निकाल आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूक राज्य निवडणूक आयोग कधीही जाहीर करू शकतं, अशी परिस्थिती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये मतदारांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ङ्घएकूण पुरुष मतदार ५ लाख ६५ हजार ७७९ एवढे आहेत तर एकूण महिला मतदार ६ लाख ०८ हजार ११० असून १० इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात असे एकूण ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार आहेत. सर्वच तालुक्यांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg