loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय. हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल अँन्ड ज्यू. कॉलेज, खेड येथे विज्ञान प्रदर्शन व कला प्रदर्शन उत्साहात

खेड (दिलीप देवळेकर)- अल् मदिना वेलफेअर असोशिएशन व्दारा संचलित एम. आय. हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल अँन्ड ज्यू. कॉलेज, खेड येथे दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी विज्ञान प्रदर्शन व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बशीरभाई हजवानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे उपाध्यक्ष सिकंदरभाई जसनाईक, सहसचिव संस्थेचे खजिनदार गुलाम मोहिद्दीन तांबे, सहखजिनदार सिराज पटेल, आरिफ मुल्लाजी, शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, पालक प्रतिनिधी सदस्य, शाळेचे सर्व शिक्षकवृंद, विदयार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनामध्ये नर्सरी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक विविध प्रकारच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. यामध्ये टाकाऊपासून टिकाऊ, वेळेची बचत, नैसर्गिक शेती, प्रगततंत्रज्ञान, आरोग्य आणि स्वच्छता व पर्यावरणाविषयी जागरूकता इत्यादी विषयावर आधारित विज्ञान प्रतिकृती साकारून आपले कौशल्य व विज्ञान विषयाची आवड दाखवून दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य हेतू म्हणजे उद्याच्या युगातील वैज्ञानिक निर्माण करणे. तसेच विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक गोष्टींची जाणीव करून देणे हा असतो. म्हणूनच या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी,शिक्षकांनी तसेच पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विज्ञान प्रदर्शन प्राथमिक विभागासाठी खोत फायजा, मनाली दांडेकर व माध्यमिक - उच्च माध्यमिक विभागासाठी समिना सांगले, चोगले तनजिम, रूक्सार माखजनकर यांनी अथक परिश्रम घेतले. विज्ञान प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून प्रिया वैद्य यांनी परिक्षक म्हणून यांनी काम पाहिले. तसेच पूर्व प्राथमिक ते माध्यमिक गटातून  कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कला प्रदर्शनात छ्त्री पेटींग, वारली पेटींग, पेपर प्लेट आर्ट, ग्लास आर्ट, आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. तसेच टाकाऊपासून टिकावू , सुतळीकाम, कागदकाम, विविध प्रकारचे चित्र हे कलाप्रदर्शनात प्रभावी ठरले. नर्सरीतील विदयार्थ्यांनी कला प्रदर्शनातील प्रतिकृती सादरीकरणांने उपस्थितांची मने जिंकली. या सर्व मुलांना नर्सरी विभाग प्रमुख रिहाना चिपळूणकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कला प्रदर्शनासाठी परिक्षक म्हणून सरफराज बटे मुंबई हे लाभले.

टाइम्स स्पेशल

कला प्रदर्शनासाठी प्राथमिक विभाग प्रमुख पांचाळ सुयोग व माध्यमिक विभाग प्रमुख देवरुखकर नितीन यानी अथक परिश्रम घेतले. विज्ञान व कला प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला. यासाठी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे अल् मदिना वेलफेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष बशीरभाई हजवानी, उपाध्यक्ष निसार खतीब, स्कूल कमिटी चेअरमन सिकंदर जसनाईक, संस्था सचिव मन्सूर मुकादम, सहसचिव शौकत मुजावर, खजिनदार गुलाम मोहिद्दीन तांबे, सहखजिनदार सिराज पटेल, संचालक हनिफ घनसार आरीफ मुल्लाजी, निसार सुर्वे, दुर्वेश पालेकर, वहाब बिजले, जिब्रान हजवानी, महमुद हजवानी, अखलाक हजवानी, हनिफ तांबे, इब्राहीम हजवानी, आदम हजवानी या सर्व पदाधिका-यांनी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg