loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त झाला पाहिजे, तिसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरू

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेल्या २३ वर्षापासून दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या जंगली हत्ती यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी हत्ती पकड मोहीम राबवा, दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त झाला पाहिजे, यासाठी सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस यांनी आपले ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरू ठेवले आहे. यामुळे वन अधिकारी यांची धावपळ उडाली आहे. तर कर्नाटक मधील बारा हत्ती हे कणकुबी, मान, चिगुळा, येथे दाखल झाले आहेत! यामुळे हे हत्ती दोडामार्ग तालुक्यात पाठवण्याची शक्यता आहे. तेव्हा आता कर्नाटक राज्यातील हत्ती त्यांच्या अधिवासात पाठवण्यासाठी तातडीने हत्ती पकड मोहीम राबवली पाहिजे असे प्रविण गवस यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी वन विभागमधिल अधिकारी, शर्मा, बोराटे यांनी दोडामार्ग वन कार्यालय येथे येऊन आंदोलनकर्ते प्रविण गवस, संजय देसाई, तुकाराम बर्डे, दत्ताराम देसाई, तसेच इतर शेतकरी समवेत चर्चा केली. पण सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस आपल्या निर्णयावर ठाम राहिले. तुम्ही दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त केला पाहिजे तोपर्यंत गप्प बसणार नाही, असा प्रविञा घेतला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg