loader
Breaking News
Breaking News
Foto

धामापूर पेंडूर मोगरणे रस्त्याच्या डागडुजीचा प्रश्न २९ वर्षांनी निकाली; आम. निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

मालवण (प्रतिनिधी) - धामापूर गावातील धामापूर तलावाच्या काठाने असलेला व मोगरणेवाडी फोपळेवाडी या वाड्याना जोडणाऱ्या रस्त्याच्या सुमारे ९०० मीटरच्या भागाच्या डागडुजीचे काम वन विभागाच्या परवानगी अभावी गेले २९ वर्षे रखडल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली होती. याबाबत धामापूर सरपंच मानसी परब, सर्व ग्रा. प. सदस्य व महेश परब यांच्या प्रयत्नांची दखल शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व आमदार निलेश राणे यांनी घेत वन विभागाची परवानगी मिळवून ९०० मीटर रस्त्याच्या डागडुजीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १६ लाख रुपये निधी मंजूर करून दिले. यामुळे या रस्त्याचा प्रश्न तब्बल २९ वर्षांनी निकाली लागला असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला. धामापूर गावातील धामापूर तलावाच्या काठाने असलेला मोगरणेवाडी, फोपळेवाडी या वाड्याना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यातील काही भाग हा वनविभागाच्या संरक्षित क्षेत्रातून जातो. सन १९९७ मध्ये माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सर्वप्रथम हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यानंतर वनविभागाची परवानगी मिळत नसल्याने वनविभागाच्या हद्दीतील सुमारे ९०० मीटर रस्ता वगळून इतर रस्त्याची वारंवार डागडुजी तसेच खडीकरण डांबरीकरण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परंतु गेल्या २९ वर्षात त्या ९०० मीटर रस्त्याची मात्र कोणतीही डागडुजी परवानगी अभावी रखडल्यामुळे रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली होती. मोगरणेवाडी, फोपळेवाडी यासह इतर वाड्यांमधील रहिवाशांना ग्रामपंचायत कामकाज, बाजार, वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा या सर्व कामांसाठी याच रस्त्याचा पर्याय असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे वनविभाग क्षेत्रातील हा रस्ता सुस्थितीत व्हावा, अशी ग्रामस्थांची बऱ्याच वर्षांची मागणी होती. या रस्त्याच्याप्रश्नी धामापूर ग्रामपंचायतच्या सरपंच मानसी परब सर्व ग्रा. पं. सदस्य आणि महेश परब यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नांची दखल शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली. आम. राणे यांनी सातत्याने पाठपुरावा करून अशक्य वाटणारी परवानगी वनविभागाकडून मिळवून या ९०० मीटर रस्त्याच्या डागडुजीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १६ लाख रुपये निधी सुद्धा मंजूर करून दिला. त्यामुळे आता वनविभागाच्या माध्यमातून या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. तसेच या कामी स्यमंतक संस्थेचे सचिन देसाई यांचेही सहकार्य लाभले, असे सरपंच मानसी परब यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

या धामापूर मोगरणे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी जानेवारी जि. प. चे माजी सदस्य संतोष साटविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व धामापूर सरपंच मानसी परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, मालवण वनपाल सदानंद परब, वनरक्षक अतुल खोत, लक्ष्मण आमले, ठेकेदार अरविंद सावंत, ग्रामपंचायत सदस्य अस्मिता फोपळे, प्रशांत गावडे, स्वप्नील नाईक, सामाजिक कार्यकर्ते महेश परब राजन माणगावकर, ग्रामस्थ आनंद तोरसकर, अमोल परब, दिनेश ठाकूर, बाळकृष्ण निकम, अविनाश निकम, रामचंद्र गावडे, निलेश गावडे, सिद्धेश फोपळे, सिद्धेश पाताडे, सुंदर पोफळे, गणेश फोपळे, रामचंद्र फोपळे, भरत फोपळे, प्रकाश साडवेलकर, राजाराम आमरे, रघुनाथ धनावडे, रमेश महाजन, भाई सावंत, अशोक शृंगारे, वर्षा सुतार, प्रवीण परब, एकनाथ परब, सुभाष धामापूरकर, दीपक झोरे, प्रकाश झोरे आदी उपस्थित होते. वनविभाग हद्दीतील सदर रस्ता मुरूम दगड आणि माती वापरून सपाटीकरण आणि मजबुतीकरण करून सुसज्ज करण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल संदिप कुंभार यांनी यावेळी सांगितले. यावेळी धामापूर मोगरणे रस्ता मंजूर केल्याबद्दल आम. निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे सरपंच मानसी परब यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg