loader
Breaking News
Breaking News
Foto

बदलत्या हवामानाचा आंबा-काजूला फटका; बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण

​सावंतवाडी : कोकणची शान असलेल्या आंबा आणि काजू बागायतीवर निसर्गाच्या लहरीपणाचे सावट पसरले आहे. यंदाच्या बदलत्या हवामानामुळे बागायती संकटात सापडल्या असून, उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कडाक्याच्या थंडीनंतर अचानक झालेले हवामानातील बदल आणि धुक्यामुळे आंबा-काजूचा मोहर धोक्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाने अभूतपूर्व ओढ दिली. १५ मे २०२५ पासून सुरू झालेला पाऊस थेट ऑक्टोबर - नोव्हेंबर पर्यंत बरसत होता. तब्बल सात महिने चाललेल्या या पावसानंतर कडाक्याची थंडी पडली. मात्र, १ जानेवारी रोजी मुंबईसह इतर भागात झालेल्या पावसामुळे वातावरणात अनपेक्षित बदल झाले. सध्याचे ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे पिकांवर किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रगतशील बागायतदार बाळासाहेब परूळेकर यांनी परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, "हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम मोहोराच्या गुणवत्तेवर झाला आहे. सध्या झाडांवर नर आणि मादी मोहर पाहता, नर मोहोराचे प्रमाण जास्त आहे. परिणामी, मोहोरामध्ये अपेक्षित 'दाणे' (फळे) धरताना दिसत नाहीत. यामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे."

टाईम्स स्पेशल

सात महिन्यांच्या पावसामुळे जमिनीतील ओलावा आणि झाडांचे चक्र विस्कळीत झाले.​धुके आणि ढगाळ वातावरण, यामुळे तुडतुडे आणि इतर कीड लागण्याचा धोका वाढला आहे. नर मोहोराचे अधिक प्रमाण असल्यामुळे प्रत्यक्ष फळधारणा कमी होत आहे. ​निसर्गाच्या या लहरीपणामुळे कोकणातील आर्थिक कणा असलेला आंबा-काजू बागायतदार सध्या चिंतेत असून, कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg