loader
Breaking News
Breaking News
Foto

चर्मकार समाज सावंतवाडी शाखेच्यावतीने अ‍ॅड. अनिल निरवडेकर व सागर चव्हाण यांचा सत्कार

सावंतवाडी (प्रतिनिधी) - समाज बांधवांचा सत्कार हा कुटुंबाचा सत्कार मानतो या सत्कारातून मला निश्चितच ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. वकिली हा असा माझा अलंकार आहे, की जो आयुष्यभर समाजाची सेवा करू शकतो. आता माझी जबाबदारी वाढली असून सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगरसेवक पदी बहुमताने जनतेने मला निवडून दिले आहे. त्यामुळे समाजासाठी निश्चितच काम करून नगरपरिषदेत दलित समाजाला मिळणारा निधी उपलब्ध करून देताना समाज बांधवांचा सुद्धा मानसन्मान ठेवू असे प्रतिपादन नवनिर्वाचित नगरसेवक अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी सावंतवाडी येथे बोलताना केले. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेच्या वतीने सत्कार समारंभात ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सागर चव्हाण, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ शरद जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, निवडणूक म्हटलं की हार जित होत असते. माझ्या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून माझ्या समाजाचे तानाजी वाडकर हे होते. त्यांचे काम सुद्धा त्या काळात प्रेरणादायी असेच होते. या समाज मंदिराच्या जागेवर त्यावेळी उकिरडा होता तो त्यांनी बाजूला करून समाजमंदिर सारखी वास्तू उभी केली. आपापल्या परीने त्यांनी काम केले असून मतदारांनी आता मला संधी दिली आहे, या संधीचे मी निश्चितच सोनं करेल असे ते म्हणाले. यावेळी पत्रकार सागर चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला. ते म्हणाले की हा सन्मान ज्यांनी मला माझा जीवन प्रवास खडतर केला त्यांना आपण बहाल करतो, असे सांगितले. समाजाकडून झालेल्या सत्काराने आपणास दिलेली ऊर्जा निश्चितच प्रेरणादायी असेल, प्रिंट मीडिया सोडून आपण डिजिटल मीडियाचे जाळे सुरू केले. यातून आपणाला अनेकांनी जातीतून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र जसे आपल्या जीवनात त्रास देणारे होते तसेच आपल्या सोबतही राहणारे होते. त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो असे सांगितले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ शरद जाधव यांनी आपला जीवन प्रवास कथन केला.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमास सावंतवाडी शाखेचे तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, सचिव जगदीश चव्हाण, ज्येष्ठ सदस्य बाबुराव चव्हाण, नरसू रेडकर, सूर्यकांत सांगेलकर, नरेश कारीवडेकर, राजेश फोंडेकर, सुनील तुळसकर, विजय चव्हाण, संदीप बिबवणेकर, महादेव पवार, संभाजी कांबळे, गोविंद चव्हाण आदी समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आपल्या मनोगतात निवृत्त माजी सहाय्यक शिक्षणाधिकारी पी.बी. चव्हाण कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश चव्हाण यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg