loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी, राज्यातून चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावली

रसायनी (राकेश खराडे) - द इन्फिनिटी स्कूल, देवाची उरुळी, पुणे येथे महाराष्ट्र राज्य आईस स्टॉक स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५-२६ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धा आईस स्टॉक स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ पुण्याचे अध्यक्ष श्रीकांत सोमसे, सचिव अक्षता वीरकर व टेक्निकल डायरेक्टर सुनील कदम यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली पार पडली. तसेच ही स्पर्धा महाराष्ट्र आईस स्टॉक स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश राठोड व सचिव अजय सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाली. स्पर्धेचे भव्य उद्घाटन प्रशांत सातव व प्रवीण सातव (डायरेक्टर इन्फिनिटी स्कूल) यांच्या शुभहस्ते पार पडले. स्पर्धा शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संदेश, प्रवीणसिंह कोळी, यश सरनाईक व गायत्री यांनी पंच म्हणून अत्यंत जबाबदारीने काम पाहिले. यावेळी २५० हून अधिक खेळाडूंचा सहभाग होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ११ खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यापैकी ९ खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी रायगड जिल्ह्याने पटकावली, ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली. रायगड जिल्ह्याच्या संघाचे नेतृत्व जिल्हा प्रतिनिधी म्हणून भूपेंद्र गायकवाड व संस्कृती घरत यांनी केले तर टीम को-ऑर्डिनेटर म्हणून बिपीन जाधव यांनी संघ व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. यावेळी संस्कृती घरत यांनी खेळाडूंना मानसिक बळ, शिस्त व स्पर्धात्मक आत्मविश्वास देत उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तसेच भूपेंद्र गायकवाड यांनी आपल्या अनुभवसंपन्न नेतृत्वातून, काटेकोर नियोजनातून व खेळाडूंवरील वैयक्तिक लक्षातून संघाला प्रेरणा दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच रायगड जिल्ह्याच्या संघाने राज्यपातळीवर आपली ठसठशीत छाप पाडली. सर्व खेळाडू, मार्गदर्शक, समन्वयक व पालकवर्गाचे सर्वत्र अभिनंदन होत असून, रायगड जिल्हा भविष्यात आईस स्टॉक स्पोर्ट्समध्ये आणखी मोठी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg