loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 'इंटरनॅशनल ह्युमन राइट्स'च्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. सुभाष गोवेकर यांची नियुक्ती

सावंतवाडी : मानवाधिकार आणि सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेल्या 'इंटरनॅशनल ह्युमन राइट्स सोशल जस्टिस कमिशन' च्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सावंतवाडी येथील प्रा. सुभाष गोवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संतोष बजाज यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली. ​प्रा. गोवेकर यांची ही नियुक्ती 'ज्येष्ठ नागरिक हक्क आणि संरक्षण' या विभागांतर्गत करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील अनुभव आणि देशसेवेप्रती असलेली निष्ठा पाहून ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या पदाच्या माध्यमातून प्रा. गोवेकर यांना जिल्ह्यातील ​महिला व पुरुष छळवणूक, हुंडाबळी आणि बाललैंगिक अत्याचार रोखणे.​मानवी तस्करी, भ्रष्टाचार आणि दहशतवादासारख्या सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देणे.​पोलीस प्रशासन आणि शासकीय यंत्रणेसोबत समन्वय साधून पीडितांना न्याय मिळवून देणे. ​मानवी हक्कांचे उल्लंघन होणाऱ्या घटनांची माहिती वेळोवेळी शासनाला कळवणे आदींची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल प्रा. सुभाष गोवेकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg