loader
Breaking News
Breaking News
Foto

नाम. योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे मोठ्या धुमधडाक्यात पायाभरणी समारंभ

दापोली (प्रतिनिधी) - नुसत्तेच आश्वासनाची खैरात कधीच करत नाहीत किंवा करु म्हणून नुसताच विकास कामांच्या पोपट पंचीचा बोलबालाही कधीच करत नाहीत, तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.. या उक्तिचा प्रत्यय नाम योगेशदादा कदम यांच्या कृतीतून दापोलीकरांनी आज प्रत्यक्षपणे खरंच अनुभवला दापोली शहरात विविध प्रकारची समाजोपयोगी सामाजिक हिताची विकास कामे थोडी थोडकी नव्हेत तर तब्बल ७.५० कोटी रुपये निधींची विकास कामे मार्गी लावण्याचे प्रामाणिक आणि महत्वाचे काम महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्राम विकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि औषध प्रशासन राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या अथक परिश्रमाच्या प्रयत्नाने झाले ही विकास कामांची फलश्रुती म्हणजे दापोली शहरासाठीचा हा सुदीन म्हणावा लागेल. दापोली शहरात नाम योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत आणि शुभहस्ते मोठया धुमधडाक्यात विविध प्रकारच्या समाजोपयोगी सामाजिक हिताच्या विकास कामांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विकास कामांमध्ये दापोली शहरातील नवानगर येथील जि प. मराठी शाळा ते अंकुश माने यांच्या घरापर्यंत बांधी बांधणे, शहारातील उत्तम महाडकर ते रवी कदम घर गटार, रवि कदम घर ते सार्वजनिक शौचालय गटार, काळकाई मंदिर लादी प्लास्टर, काळकाई मंदिर अंतर्गत रस्ता डांबरीकरण, धोत्रे गल्ली ते सोंडकर घर रस्ता कॉक्रिटिकरण करणे , शौकत काझी ते बुध्द विहार रस्ता डांबरीकरण करणे, पाण्याची टाकी योजनेचे बळकटीकरण करणे, दापोली खेड मुख्य रस्ता ते अलबर अपार्टमेंट डांबरीकरण करणे, मुनाफ राजापकर घर ते चोरगेवाडी नाळा चॅनेलाईज (टप्पा १ व टप्पा २), विजय माळी घर ते राजाराम खेडेकर आरसीसी गटार, तळवटकर घर ते आबा जाधव घर रस्ता कॉक्रिटिकरण करणे, रिक्षा स्टँड परिसर कॉक्रिटिकरण करणे, लियाकत घर चाल ते महमद पॅराडाईज गल्ली बंदिस्त गटार, खोंडा मशिदीकडे जाणा-या रस्त्यालगत संरक्षक भिंत, नर्सरीरोड मजबुतीकरण, कलावती मंदिर ते के.के.व्हि.वसाहत (जूनी) गटार, नदिला बांधी बांधणे (बेलोसे घर घरामागे), ब्रम्हकुंड मागे नदीला बांधी, मारुती मंदिरशेजारील पुल, सार्वजनिक विहीर ते गद्रे पुल नाळयाचे सुशोभीकरण, जैन मंदिरासमोर आरसीसी पुल बांधणे, कब्रस्तानात जवळचे कॉर्नर सुशोभीकरण करणे, गार्डनमध्ये ओपन जीम करणे, साबळे गल्ली गटार मजबुतीकरण करणे, आशिष अपार्टमेंट ते गद्रे पुल गटार, कदम गुरुजी ते मुख्य रस्ता पाखाडी, शिंदे घर-भागवत घर- दुर्वे घर -जाधव घर-गाडगीळ घर रस्ता डांबरीकरण व गटार, फडके गल्ली शेंगळे घराजवळ रस्ता व गटार, बेबी कदम घर ते काद्री कंपाऊंड गटार आदी विविध अशा अनेक प्रकारच्या विकास कामांचा यात समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

नाम योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत आणि शुभहस्ते पार पडलेल्या या सगळ्या विकास कामांच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, उपनगराध्यक्ष खालीद रखांगे, माजी समाज कल्याण समिती सभापती भगवान घाडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, शिवसेना तालुकाप्रमुख उन्मेष राजे, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई, विधानसभा क्षेत्र संघटक प्रदीप सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर, शहर प्रमुख प्रसाद ऊर्फ पप्पू रेळेकर, माजी नगराध्यक्षा रसिका पेठकर, मंदार केळकर प्रकाश साळवी, सुनिल रिसबूड, प्रितम शिंदे, सुयोग घाग, स्वप्निल पारकर, किर्ती परांजपे ,डॉ. शबनम मुकादम, सतीश शिर्के, मंगेश राजपुरकर, नगरसेवक प्रिती शिर्के, नौसिन गिलगीले, अश्विनी लांजेकर ,शिवानी खानविलकर, रिया सावंत, विलास शिगवण, संतोष कलकुटके, सुनिल दळवी, चारुता कामतेकर, रोहीणी दळवी, अमित पारदुले, सचिन जाधव तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि शिवसेना युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकार्‍यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg