loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने उदय रावणंग यांना कै. सुभाष शांताराम गोयथळे स्मृती गौरव पुरस्कार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुका पत्रकार संघ, गुहागर यांच्या वतीने वरवेली येथील रहिवासी व गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष उदय वसंत रावणंग यांना पत्रकार दिनाचे औचित्य साधून कै. सुभाष शांताराम गोयथळे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गुहागर तालुका अपंग पुर्नवसन संस्थेच्या माध्यमातून गेली चोविस वर्षे उदय रावणंग हे अविरतपणे दिव्यांग बंधु-भगिनीच्या सेवेकरता केलेले कार्य फार मोलाचे आहे. याची दखल घेऊन कै. सुभाष शांताराम गोयथळे स्मृती गौरव पुरस्कार २०२५ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा मँगो व्हिलेज बँक्वेट हॉल गुहागर संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ, सन्मानपत्र, धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी आमदार डॉ. विनय नातू, गुहागर नगरपंचायत नगराध्यक्ष नीता मालप, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, तहसीलदार परीक्षित पाटील, गुहागर नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, श्री दुर्गादेवी देवस्थानचे सचिव संतोष मावळणकर, गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, मँगो व्हिलेजचे श्रीहरी पालवणकर, मनसे गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, उद्योजक राजन दळी, अमरदीप परचुरे , विनायक ओक यांच्यासह उपाध्यक्ष सत्यवान घाडे, सचिव निलेश गोयथळे,खजिनदार संकेत गोयथळे, सदस्य गणेश धनावडे, मंदार गोयथळे, आशिष कारेकर, संतोष घुमे यांच्यासह नगरपंचायत चे सर्व नगरसेवक, नगरसेविका तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg