loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा रत्नागिरी जिल्हा मेळावा उत्साहात

आबलोली (संदेश कदम) - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रत्नागिरी जिल्हास्तरीय वार्षिक मेळावा गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेच्या श्री शिवछत्रपती सभागृहात नुकताच संपन्न झाला. सदरच्या मेळाव्याचे कार्यक्रमाध्यक्ष स्थान गुहागरचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांनी भूषविले. जिल्हा मेळाव्यात जिल्ह्यामधील गुणवंत मुख्याध्यापक व शिक्षक यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रत्नागिरी जिल्हा व गुहागर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज पाटपन्हाळे विद्यालयात नुकताच रत्नागिरी जिल्हास्तरीय वार्षिक मेळावा कार्यक्रमाध्यक्ष डॉ.विनय नातू, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाध्यक्ष, विशेष अतिथी व मान्यवर यांच्याहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमात माजी कोकण पदवीधर आमदार कै. अशोक मोडक, शिक्षक परिषद संस्थापक अध्यक्ष कै. वसंतराव काणे, कै. उल्हास फडके, रत्नागिरीचे माजी शिक्षणाधिकारी कै. प्रकाश परब, कामगार नेते कै. बाबा आढाव व इतर सामाजिक चळवळीमध्ये असणाऱ्या व नुकतेच निधन झालेल्या मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सुस्वर सादर केले. रत्नागिरी जिल्हास्तरीय वार्षिक मेळावा कार्यक्रमाध्यक्ष, प्रमुख अतिथी यांच्यासह राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील, राज्य कार्यवाह लक्ष्मण वालगुडे, राज्य उपाध्यक्षा हेमलता मुनोत, कोकण विभागाचे माजी अध्यक्ष रवींद्र इनामदार, कोकण विभाग सहकार्यवाह सुनील गौड, कोकण विभाग कोषाध्यक्ष प्रकाश पाटील, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष किरण देशपांडे, जिल्हा कार्यवाह पांडुरंग पाचकुडे, जिल्हा सहकार्यवाह विनायक जाधव, जिल्हा संघटक गणेश कुलकर्णी, जिल्हा कोषाध्यक्ष राजन नाईक, जिल्हा महिला संघटक काजल राऊत, जिल्हा उपाध्यक्ष व चिपळूण तालुकाध्यक्ष जिवन पाटील, दामिनी भिंगार्डे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष राजेश आयरे, राजापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, मंडणगड तालुका अध्यक्ष अमित रसाळ, खेड तालुका अध्यक्ष विजय मस्के, संगमेश्वर तालुका अध्यक्ष भरत धनपाल, दापोली तालुका अध्यक्ष संदीप गोरीवले, गुहागर तालुका अध्यक्ष सुमंत भिडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य व तालुका कार्यकारणी सदस्य तसेच संघटनेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाध्यक्ष , विशेष अतिथी व मान्यवर यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg