loader
Breaking News
Breaking News
Foto

झरेवाडी येथील रस्ता कामाचे भूमिपूजन

रत्नागिरी - भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंजूर केलेल्या विकासनिधीतून झरेवाडी येथील अरविंद कळंबटे वेल्डिंग वर्क्स ते अवधूत कळंबटे यांचे घरापर्यंत जाणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन भाजपा दक्षिण रत्नागिरी तालुकाध्यक्ष दादा दळी यांचे हस्ते झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी दळी यांचे सोबत टिके गावाचे माजी सरपंच व चांदेराई, हरचिरी विभागाचे भाजपचे नेते गुरुदास गोविलकर, लीगल सेलचे तालुका अध्यक्ष ऍड. अवधूत कळंबटे, तालुका उपाध्यक्षा सौ. नेहा कळंबटे, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन कळंबटे, मानकरी सुभाष कळंबटे, वसंत कळंबटे, झरेवाडी भाजपा बूथ अध्यक्ष प्रविण कळंबटे व मोरेश्वर कळंबटे, ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी शितप, दिनेश तांबे, तालुका कार्यकारिणी सदस्य जयवंत कळंबटे, स्मिता गोताड व अन्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

टाइम्स स्पेशल

याप्रसंगी गुरुदास गोविलकर व दादा दळी यांनी उपस्थितांना संबोधित केले. दादा दळी यांनी यावेळी महाराष्ट्र शासनाच्या असलेल्या योजनांची माहिती देऊन हे महायुतीचे सरकार गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. यावेळी झरेवाडी येथील मंजूर केलेल्या विकास कामांबाबत गावाच्या वतीने ऍड. अवधूत कळंबटे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अनिकेत पटवर्धन व तालुकाध्यक्ष दादा दळी यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg