loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा स्तरिय कराटे स्पर्धेत २०० खेळाडूंचा सहभाग

रत्नागिरी : जिल्हा कराटे असोसिएशनतर्फे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेत विविध शाळांमधील सुमारे २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला हाेता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत रत्नागिरीतील एमएमए फिटनेस सेंटर, फाटक हायस्कूल, कॉन्व्हेंट हायस्कूल-उद्यमनगर, जीजीपीएस स्कूल, माने इंटरनॅशनल स्कूल, कॉन्व्हेंट हायस्कूल शहर, पुष्पदत्त स्कूल, दामले विद्यालय, रा. भा. शिर्के हायस्कूल, सेंट थॉमस स्कूल, मुकुंद माधव विद्यालय, फातिमा सी. बी. एस्सी. कॉन्व्हेंट स्कूल, मराठा मंदिर ग्लोबल स्कूल या शाळांमधील खेळाडूंनी सहभाग घेतलेला होता.

टाईम्स स्पेशल

कराटे असोसिएशनचे अध्यक्ष जावेद मिरकर, सचिव सूरज बने, खजिनदार अरुण बेग, सदस्य रितेश बेग, नौशीन कापडी यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले. पंच म्हणून आयान मिरकर, तेजस जाधव, प्रथम बेग, रिया माचकर, प्रेम बेग, दिव्य यादव, ध्रुव बसनकर, स्पर्श लिंगायत, स्पंदन लिंगायत, आराध्या चव्हाण, लक्ष्मी पवार, फातिमा बुड्ये, झैद बुड्ये, श्लोक सावंत, आर्या पवार, कार्तिक राठोड, रोमित घोसाळे यांनी सहकार्य केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रशांत जाधव यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg