loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणचे नेते , खासदार नारायण राणे यांचे निवृत्तीचे संकेत

कणकवली : राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायणराव राणे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सिंधुदुर्ग मेळाव्यात ‘आता ठरवलयं घरी बसायचं दोन्ही मुलांना सांगेन, नांदा सौख्य भरे’ असे भावनिक वक्तव्य कार्यकर्त्यार्ंना उद्देशून त्यांनी केले. राणे यावेळी म्हणाले, राजकरणात कटकारस्थाने सुुरु आहेत, त्यामुळेच आता घरी बसायचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मुले चांगले काम करीत आहेत. चांगल्याला जोपासण्याची गरज आहे. सभेत बोलताना खासदार राणे यांनी आपल्या साधेपणाचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘आजही नारायण राणे रस्त्यावर भाजी घेतो, माझ्या गाडीला काळ्या काचा नाहीत, माणूसकी हाच माझा धर्म आहे, अनेकांनी राजकीय वाटचालीत अडथळे निर्माण केलेत, पण माझा संघर्ष कायम राहिला आहे.’

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीदरम्यान नारायण राणे पूत्रांमध्ये वादंग निर्माण झाले होते. निलेश आणि नितेश राणे या दोन्ही बंधूंनी एकमेकांच्यावर आणि पक्षावर जोरदार टीका केली होती.आता भाजपा नेते नारायण राणे यांनी दोघांमध्ये काहीही वाद नाहीत आता निवडणूका संपल्या आहेत असे सांगत या वादावर पडदा टाकला आहे. यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिले आहेत.नारायण राणे यांनी स्थानिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे शक्तिप्रदर्शन केले. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी हे मोठं शक्ती प्रदर्शन केले. या वेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणे कणकवलीत येथे हजर होते.

टाइम्स स्पेशल

महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, एकत्र रहा, पैशासाठी राजकारण करू नका, असे पैसे पचत नाहीत. मला कोणाचीही भिती नाही. तसेच द्वेषाच्या राजकारणाला थारा देवू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg