loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीच्या १० वर्षीय कबीर हेरेकरची 'गोल्डन' भरारी; ५० मॅरेथॉन पूर्ण करण्याचा अनोखा टप्पा गाठला

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - 'उंची लहान, पण कीर्ती महान' या म्हणीचा प्रत्यय सावंतवाडीतील एका चिमुरड्याने संपूर्ण देशाला करून दिला आहे. सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कबीर हेरेकर याने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी तब्बल ५० मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ४ जानेवारी रोजी गोवा येथे आयोजित मॅरेथॉनमध्ये कबीरने आपले ५० वे शतक पूर्ण केले. ५ किलोमीटरचे अंतर त्याने अवघ्या २५ मिनिटांत पार केले. त्याच्या या जिद्दीचे कौतुक करत गोवा येथील 'I-Run Foundation' कडून त्याला मेडल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजची युवा पिढी मोबाईल आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेली असताना, कबीरने मैदानात घाम गाळून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. त्याने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये अंतरे पार केली आहेत: ​२, ५, १०, ११, २१ आणि २५ किलोमीटर अंतर पार केले आहे. ​विशेष विक्रम, गोवा-सावंतवाडी इंटरसिटी स्पर्धेत २५ किमी आणि शिवजयंती 'आरमार रन'मध्ये २१ किमी धावणारा तो सर्वात लहान धावपटू ठरला आहे. ​कबीरने केवळ कोकण किंवा गोवाच नव्हे, तर पुणे इंटरनॅशनल, टाटा 10k चॅलेंज, छित्री अल्ट्रा, बेळगावी हिली रन आणि कर्नाटक रोटरी मॅरेथॉन अशा नामांकित स्पर्धांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. 'सिंग यंग चॅम्पियनशिप'मध्ये त्याने सलग दोन वर्षे द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

टाइम्स स्पेशल

​"प्रत्येक मुलात एक सुप्त गुण असतो, पालकांनी फक्त त्याला वाव दिला पाहिजे," असा विश्वास कबीरचे वडील नवीद हेरेकर आणि आई नबीला हेरेकर यांनी व्यक्त केला. कबीरच्या या यशात त्याच्या शाळेचा, म्हणजेच शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. भविष्यात धावण्याच्या जोरावर ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणे, हेच कबीरचे एकमेव ध्येय आहे. त्याच्या या जिद्दीचे संपूर्ण सावंतवाडी परिसरातून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg