loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसेच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हादरले

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या सहा उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आक्षेप असलेल्या निवडणुक निर्णय अधिकारी वृषाली पाटील तसेच सत्वशिला शिंदे यांच्या संदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल ठामपा आयुक्त मुख्य निवडणुक अधिकारी सौरव राव यांनी बुधवारी निवडणुक आयोगाला पाठवला आहे. त्यामुळे ह्या वादग्रस्त अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडु आता आयोगाच्या कोर्टात गेला आहे. बिनविरोध निवडणुक प्रकरणात सत्ताधाऱ्यांशी संगनमत केल्याच्या आरोपावरून या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत २४ तासात कार्यवाही करण्याचा अल्टीमेटम देत ठिय्या मारण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक १८ आणि प्रभाग ५ मधील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांशी संगनमत करीत पक्षपाती भूमिका घेऊन बिनविरोध उमेदवार निवडीत साह्य केल्याचा आरोप मनसेने वृषाली पाटील आणि सत्वशिला शिंदे ह्या दोन अधिकाऱ्यांवर केला होता. या अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुख्य निवडणुक आयुक्तांकडे तसेच न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यानंतरही कारवाई न झाल्याने मंगळवारी अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली होती. तसेच २४ तासांत कार्यवाही न केल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या मारण्याचा इशारा दिला होता.

टाइम्स स्पेशल

मनसेच्या या मागणीवर आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासित केले होते. त्यानुसार, पालिका प्रशासनाने बुधवारी बिनविरोध निवड प्रकरणी दोन्ही वादग्रस्त अधिकाऱ्या बाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल निवडणुक आयोगाकडे पाठवला आहे. अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg