loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगडात घर बांधकामादरम्यान देव्हाऱ्यातील सोन्याच्या मूर्तीची चोरी

खेड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील दुधरे येथे घराचे बांधकाम सुरू असताना देव्हाऱ्यात ठेवलेल्या सोन्याच्या दोन मौल्यवान मूर्ती चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिलीप बाबुराव दळवी (वय ६७, रा. दुधरे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दळवी यांचे दुथरे येथील जुने घर पाडून त्याच जागेवर नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. या कामादरम्यान त्यांनी घरातील देव्हारा चौथऱ्यावर मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत ठेवला होता. ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०.३० ते ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या देव्हाऱ्यातून सुमारे ८.५ ग्रॅम वजनाची सोन्याची तुळजाभवानी देवीची मूर्ती व ८.५ ग्रॅम वजनाची सोन्याची धारेश्वरी देवीची मूर्ती असा एकूण १ लाख ८४ हजार ९५५ रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेची रीतसर तक्रार ६ जानेवारी रोजी दुपारी १२.२५ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून, पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg