loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षक कपात धोरणाविरोधात वायंगणीमध्ये जनआंदोलन

मालवण (प्रतिनिधी) - पटसंख्येच्या निकषांवर शिक्षक कपात करणे अन्यायकारक असून शासनाने सदर निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी करत वायंगणी ग्रामस्थांनी शासनाच्या शिक्षक कपात धोरणाच्या विरोधात वायंगणी ग्रामपंचायत ते ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय या मार्गावर जनजागृती रॅली काढत संताप व्यक्त केला. रॅलीचे पुढे सभेत रूपांतर झाले. सभेत शासनाच्या निर्णयावर रोष व्यक्त करण्यात आला. सभेचे अध्यक्षपद वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांनी भूषविले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सभेदरम्यान सरपंच रुपेश पाटकर, ज्ञानदीप संस्था अध्यक्ष हनुमंत प्रभू, संस्था खजिनदार समृद्धी आसोलकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, सचिन रेडकर, रसिका सावंत, शामसुंदर नाईक, संजना रेडकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सुधाकर वायंगणकर व उदय दुखंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हडकर, संस्था सचिव वैभव जॊशी, रावजी सावंत यांनी शिक्षक कपात धोरणावर कडाडून टीका केली. कोकणातील भौगोलिक परिस्थिती, वस्तीची विरळता व ग्रामीण वास्तव लक्षात घेता केवळ पटसंख्येच्या निकषांवर शिक्षक कपात करणे अन्यायकारक असून या निकषांचा या भागाला थेट अंमल लागू होत नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शासनाने सदर निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी एकमुखी मागणी सभेत मांडण्यात आली. शिक्षक कपात धोरणामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांवर गंभीर परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा येत असल्याची ठोस भूमिका यावेळी मांडण्यात आली.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, सभेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी एकमताने मान्य करण्यात आली. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासन दरबारी मान्यता मिळावी, असा ठराव सभेदरम्यान पारित करण्यात आला. बदलत्या शैक्षणिक गरजांचा विचार करता ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात सक्षम करण्यासाठी सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम अत्यावश्यक असल्याचे मत पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत वायंगणी ज्ञानदीप शैक्षणिक समन्व्यय समितीने शाळा सेमी इंग्रजी माध्यम सुरु करण्याकरिता ज्ञानदीप संस्थेला मदत करण्याचे आश्वासन दिले. व पुढील शैक्षणिक वर्षांपासून सेमी इंग्लिश सुरु करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्याची तयारी दर्शविली. सदर जनजागृती रॅली शांततामय मार्गाने पार पडली असून विद्यार्थ्यांचे हित, दर्जेदार शिक्षण व ग्रामीण शाळांचे अस्तित्व टिकवणे हाच या आंदोलनाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या आंदोलनाचे आयोजन ग्रामपंचायत वायंगणी ज्ञानदीप शैक्षणिक समन्वय समिती व ज्ञानदीप संस्था, वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg