loader
Breaking News
Breaking News
Foto

इम्तियाज जलील यांच्यासमोरच एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

छत्रपती संभाजीनगर: जिल्हात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना नाराज कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. बायजीपुरा परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान एमआयएमच्या दोन गटांमध्येच जोरदार हाणामारी झाली. ही संपूर्ण घटना जलील यांच्या उपस्थितीत घडली आहे.एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील बायजीपुरा भागातून पदयात्रा काढत होते. पदयात्रा सुरू झाल्यापासूनच काही कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत होते. अचानक काही कार्यकर्त्यांनी जलील यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पदयात्रा अडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विरोध करणारे आणि जलील समर्थक कार्यकर्ते आमनेसामने आल्याने वातावरण तापलं. पाहता पाहता दोन्ही गटांमध्ये जोरदार हमरीतुमरी होऊन हाणामारी सुरू झाली. रस्त्यावरच गोंधळ उडाला, काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली. या घटनेमुळे बायजीपुरा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.

टाइम्स स्पेशल

विरोध करणारे आणि जलील समर्थक कार्यकर्ते आमनेसामने आल्याने वातावरण तापलं. पाहता पाहता दोन्ही गटांमध्ये जोरदार हमरीतुमरी होऊन हाणामारी सुरू झाली. रस्त्यावरच गोंधळ उडाला, काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांचा हस्तक्षेप, सौम्य लाठीचार्ज! परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली. या घटनेमुळे बायजीपुरा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg