loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण शहरात रात्रीच्या वेळीही कचरा संकलन मोहिमेस सुरुवात

मालवण (प्रतिनिधी) - मालवण हे पर्यटन शहर असल्यामुळे स्वच्छतेची विशेष गरज लक्षात घेता तसेच व्यापाऱ्यांच्या व हॉटेल व्यावसायिकांच्या सोयीच्या दृष्टीने मालवण बाजारपेठ तसेच शहराच्या काही महत्वाच्या भागात नगरपालिकेद्वारे रात्रीच्या वेळीही कचरा संकलनास सुरुवात करण्यात आलेली आहे. शहराच्या काही महत्वाच्या भागात तसेच समुद्र किनारी उघड्यावर कचरा फेकला जात असल्याचे निदर्शनास आल्याने नगरपरिषदेने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण शहरातील बाजारपेठ ते पुढे फोवकांडा पिंपळपारपासून रॉक गार्डन व चीवला समुद्र किनारा याभागात रात्रीचे कचरा संकलन सूरु करण्यात आलेले आहे. मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी रात्रीच्या कचरा संकलनासह याभागात दिवसाही कचरा संकलन चालू ठेवले जाणार असल्याचे सांगून मालवण हे पर्यटन शहर असून येथील पर्यटन वाढीसाठी स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच यासाठी सर्व नागरिक व व्यावसायिक यांचेही योगदान महत्वाचे असून शहराच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. थोरात यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार कचरा उघड्यावर फेकणे गुन्हा असून कचरा उघड्यावर फेकल्यामुळे त्याभागात दुर्गंधी पसरून सदर ठिकाणाचे विद्रुपीकरण होते तसेच यामुळे नागरिकांना व प्राण्यांनाही आरोग्याचा धोका उद्भवतो. नागरिकांवर होणारे अस्वच्छतेचे दुष्परिणाम व शहराच्या नैसर्गिक सौंदर्यावर होणारे परिणाम लक्षात घेता सर्वांनी आपला तयार होणारा कचरा उघड्यावर न फेकता नगरपरिषदेच्या घंटा गाडीतच देणे आवश्यक आहे, असे आवाहनही मालवण नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg