loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगरपालिकेत राजकीय हालचालींना वेग; शिंदे शिवसेनेच्या ७ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्तेच्या समीकरणांना वेग आला आहे. मंगळवारी शिंदे शिवसेनेच्या सातही नवनिर्वाचित नगरसेवकांनी ओरोस येथे नगर विकास अधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली आपला स्वतंत्र गट स्थापन केला. या घडामोडीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात उपनगराध्यक्ष आणि विषय समिती सभापती पदाच्या निवडीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सावंतवाडी नगर परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली होती. त्याचे अंतिम चित्र भाजपा ११ नगरसेवक व नगराध्यक्ष (श्रद्धा सावंत-भोसले) तर शिंदे शिवसेना ७ नगरसेवक, ठाकरे शिवसेना १ नगरसेवक आणि काँग्रेस १ नगरसेवक विजयी झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजपने यापूर्वीच नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आपला गट स्थापन केला आहे. आता शिंदे शिवसेनेनेही स्वतंत्र गट स्थापन केल्याने दोन्ही पक्षांनी आपली ताकद स्वतंत्रपणे संघटित केली आहे. राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार असल्याने स्थानिक पातळीवर उपनगराध्यक्ष, विषय समित्यांच्या निवडीत भाजप आणि शिंदे शिवसेना एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, दोन्ही पक्षांनी स्वतंत्र गट नोंदवल्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी नेमकी काय रणनीती आखली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

टाईम्स स्पेशल

ओरोस येथे गट स्थापन करतेवेळी शिंदे शिवसेनेचे सर्व प्रमुख नगरसेवक उपस्थित होते. यामध्ये गटनेते खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नगरसेवक संजू परब, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी. नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक आदी उपस्थित होते. या दोन्ही पक्षांनी गट स्थापन केल्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून उपनगराध्यक्ष आणि विषय समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुती झाल्यास पदे कशी विभागली जाणार, की निवडणूक होणार, याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg