loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडच्या पार्थ पाटणेला जर्मनीमध्ये ‘एआय कॉम्प्युटर सायन्स’मध्ये मास्टर्स पदवी प्रदान

खेड (प्रतिनिधी) - पार्थ प्रसन्ना पाटणे हा एलटीटी इंग्लिश स्कूल व रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी असून त्याने जर्मनीमध्ये एआय कॉम्प्युटर सायन्स या विषयात आपल्या मास्टर्स पदवीचे शिक्षण अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. अत्यंत कठीण आणि सखोल संशोधन असलेला आपला प्रबंध (थिसिस) त्याने डिस्टिंक्शन पर्सेंटाईलसह पूर्ण केला, ही अभिमानास्पद बाब आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जर्मनीतील एआयच्या पहिल्याच बॅचमधून मास्टर्स पूर्ण करणारा तो दुसरा विद्यार्थी ठरला असून, ही कामगिरी त्याच्या बुद्धिमत्ता, सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे त्याचा हा प्रबंध पॅरिस येथे प्रसिद्ध होणार्‍या आंतरराष्ट्रीय थिसिस पेपरमध्ये प्रकाशित झाला आहे, ही बाब केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण खेड तालुक्यासाठी गौरवाची आहे. पार्थच्या या उज्ज्वल यशामुळे त्याचे आई-वडील, कुटुंबीय, शिक्षकवृंद तसेच मित्रपरिवार अत्यंत आनंदित आणि अभिमानाने भारावून गेले आहेत. खेडकरांच्यावतीने पार्थला मनःपूर्वक शुभेच्छा व भरभरून आशीर्वाद! भविष्यात तो एआय क्षेत्रात आणखी मोठी उंची गाठो, देश-विदेशात आपले व आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करो, अशी इच्छा शहरातून व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg