loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर येथील सरस महोत्सवात ग्रामीण भागातील जाखडी कलाकारांनी उडवली धमाल

आबलोली (संदेश कदम) - उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान, जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर येथे आयोजित करण्यात आलेल्या सरस महोत्सवाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या सरस महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात पंचायत समिती गुहागर आणि उमेद अभियान अंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून बचत गटांचे ३७ स्टॉल विक्रीसाठी उपलब्ध होते आणि रात्रौ सांस्कृतिक कार्यक्रमही उत्साहात संपन्न झाले. यावेळी डोंबिवली येथे आगरी महोत्सवात गाजलेला गुहागर तालुक्यातील श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ जामसुत जांभुर्णेवाडी या ग्रामीण भागातील लाल मातीतील गायक आणि कलाकारांचा जाखाडी नृत्याचा जबरदस्त कार्यक्रम संपन्न झाला. या जाखडी नृत्यांनी जबरदस्त धम्माल उडवून दिली. पंचायत समिती गुहागरचे बीडीओ शेखर भिलारे, उमेदच्या तालुका अभियान व्यवस्थापक दुर्वा ओक, राहिला बोट यांनी आणि गुहागर वाशीयांनी याच व्यासपीठावर कार्यक्रम करण्यासाठी संधी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ जामसुत, जांभुर्णेवाडी या मंडळाचे जाखडी नृत्याचे शाहीर अशोक कुंभार यांनी शाहिर मानाचा मुजरा करतो, सर्व देवांचा राजा आपला लाडका गणरायाच्या चरणाशी आपण सर्वांनी लिन होऊया असे आवाहन करीत शाहीर अशोक कुंभार यांनी गणरायाला मानाची मानवंदना करून जय गणराया वंदितो पाया या गाण्याने जबरदस्त सुरुवात केली. आज तुझे आम्ही गोड नाम घेतो पडतो तुझ्या पाया, जय गणराया वंदितो पाया गणरायाची प्रार्थना करून गणरायाच्या नामाचे आणि गुणांचे वर्णन झाले. गणरायाच्या नामाचे आणि गुणांचे, रूपाचे वर्णन करणारा गण सादर केला. अनंत नामाने नटलेला असा आमचा गणराज आहे. अनंत कामे करणारा असा आमचा गणराज आहे. सुखकर्ता, दु:खहर्ता हे फक्त आपल्या गणरायांनाच म्हणतात,म्हणूनच गणरायाचे गोड नाम आमच्या हृदयात आहे. लाडक्या गणरायाला मानाची मानवंदना, मानवंदना गौरी गणेशाला,शुभ कार्याला नमो गणेशाला.. गणा धावना.. गणा.. धावना.. धावना.. अंगणा शाहीर अशोक कुंभार यांच्या गाण्याने धमाल उडून गेली प्रार्थना झाली, गण झाला आणि शक्ती तुर्‍यांच्या नियमाप्रमाणे सह. शाहीर महेश जामसूतकर यांनी यमुना तीरी, वाजवी बासरी.आला आला नंदाचा श्रीहरी. ही गवळण सादर केली आणि धमाल उडवली.

टाइम्स स्पेशल

त्यानंतर शाहीर अशोक कुंभार यांनी सरस महोत्सवावर गुहागर तालुका आहे सुंदर गाव पहा नकाशात शोभते नाव, एक मनाचा, प्रेम पणाचा आहे म्हणे प्रेम भाव, तालुक्यातील स्वयंसहायता बचत गटांचा हा सोहळा साजरा होतोय.. या कार्यक्रमाला जमा झालो याच वेळेला. आमच्या कोकणचा मेवा हवसेने खावा, आपला घरी घेऊन तुम्ही जावा. जीवनभर सुख शांती लाभो. करू विनंती परमेश्वरा. सरस महोत्सव या कार्यक्रमाला जमा झालो या वेळेला या गाण्याने धमाल उडून दिली. त्यानंतर महाराष्ट्राच्या दर्‍या, खोर्‍यातून गाजविली तलवार... कोकणच्या भूमीमध्ये जो आज भगवा फडकतोय.. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळेच फडकतोय.. फडकला भगवा झेंडा सार्‍या महाराष्ट्राची शान.. प्रणाम माझा शिवबाला. हे गाणे सह.गायक महेश जामसुतकर यांनी गाऊन धमाल उडवली.. हे गाणे चालू असतानाच प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शनही घडविले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला. या जाखडी नृत्यात श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ जामसुत जांभुर्णेवाडी या मंडळाचे शाहीर अशोक कुंभार, सह.शाहीर सुधीर जामसूतकर, सह.शाहीर महेश जामसुतकर यांचेसह जाखडी नृत्य कलाकार पार्थ जामसुतकर, आदित्य जामसुतकर, गीतेश शिरकर, ओंकार जामसुतकर, अजित जामसुतकर,अंकुश कुंभार, दिलीप शिरकर आणि सुधीर जामसुतकर, ढोलकी वादक - शुभम जामसूतकर, विनेश शिरकर, झांज वादक - एकनाथ जामसुतकर, कोरस - दत्ताराम कोळथरकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सोहम जामसुतकर यांनी उत्कृष्टपणे सांभाळली मावळ्यांच्या भूमिकेत शंकर कोळथरकार, श्रीरंग जामसुतकर यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली साऊंड आणि लायटींग अनिल कुंभार तसेच फोटोग्राफर सुरज कोळथरकर आणि या संपूर्ण जाखडी नृत्य कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन सुनील गुडेकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg