loader
Breaking News
Breaking News
Foto

आज मंगळवारी श्रीराम मंदिरात ‘बाल आनंद मेळावा’ छोट्यांसह मोठ्यांचीही धमाल मस्ती, आवडीचा खाऊ

रत्नागिरी - येथील श्रीराम मंदिरात मंगळ. दि. ६ जाने. २०२६ रोजी ‘बाल आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला छोट्यांनी तसेच मोठ्यांनीही आवर्जुन उपस्थित रहावे, धमाल मस्ती करावी आणि मेळाव्याचा आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही हा ‘बाल आनंद मेळावा’ श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. हा ‘बाल आनंद मेळावा’ मंगळ. दि. ६ जाने. २०२६ रोजी दु. ३ ते सायं. ७ या वेळेत श्रीराम मंदिर सभागृहात संपन्न होईल. या मेळाव्यात छोट्यांना व त्यांच्यासोबत येणार्‍या मोठ्यांनाही मुक्त प्रवेश राहील. सर्व छोट्या मंडळींना धमाल मस्ती करता यावी यासाठी हा ‘बाल आनंद मेळावा’ आयोजित करण्यात येतो. या ‘बाल आनंद मेळाव्या’त छोट्यांसोबतच मोठ्यांसाठीही अनेक आकर्षणे असतील जेणेकरुन सारे जण मनसोक्त आनंद लुटतील.या ‘बाल आनंद मेळाव्या’त छोट्यांसाठी खाऊची रेलचेल असेल तसेच सर्व मोठ्यांसाठी, त्यांच्यासोबत येणारे पालक, शिक्षक व कलावंत यांच्यासाठी अल्पोपहार असेल. सारा परिसर रंगीबेरंगी फुग्यांनी व कार्टुन्सनी सजवण्यात येईल. छोट्यांना तर आल्या आल्या त्यांच्या आवडीचा खाऊ देण्यात येईल. त्यानंतर गोड शिरा, क्रीम केक असे खाऊ थोड्या थोड्या वेळाने दिले जातील. भला मोठा केक यावेळी सर्व छोट्या मोठ्यांच्या उपस्थितीत कापून सर्वांना केक दिला जाईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच या ‘बाल आनंद मेळाव्या’त अनेक प्रकारचे फनी गेम्स असतील, सुप्रसिध्द जादुगार जादुचे चमत्कार करुन सर्वांना थक्क करुन सोडतील, निसर्गप्रेमी ढालकर सर पशूपक्षांचे हुबेहूब आवाज काढून सर्वांना चकीत करतील. यावेळी लहान मुलांना त्यांच्या आवडीनुसार चेहरे आकर्षकरित्या रंगवून दिले जातील. त्यासाठी पटवर्धन हायस्कूलची कला शिक्षक मंडळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी लहान मुलांचे ‘फॅन्सी ड्रेस प्रेझेंटेशन’ देखील आयोजित करण्यात आले आहे. या ‘बाल आनंद मेळाव्या’त सर्व लहान थोर मंडळींनी धमाल मस्ती करावयाची आहे. त्यासाठी पालकांनी शक्य झाल्यास येताना बालकांना आवडीनुसार वेषभूषा करुन आणावी किंवा देवस्थानमध्येही त्यासाठी विशेष व्यवस्था उपलब्ध असेल. ‘फॅन्सी ड्रेस प्रेझेंटेशन’ ही स्पर्धा नसुन सादरीकरण असेल कारण यामध्ये सहभागी होणार्‍या सर्वांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या ‘बाल आनंद मेळाव्या’त खाऊचे अनेक स्टॉल्स असतील व स्टॉल्सवर छोट्यांना आवडणारा खाऊ ठेवण्यात येईल. या ‘बाल आनंद मेळाव्या’त सर्व छोट्यांना त्यांचा आवडीचा खाऊ देण्यात येईल तसेच मोठ्यांसाठीही अल्पोपहार देण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी येणार्‍या छोट्यांनी नटून थटून यावे असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे. या ‘बाल आनंद मेळाव्या’च्या वेळी लहान मुला मुलींची समूह नृत्ये तसेच वैयक्तिक नृत्ये देखील सादर करण्यात येतील. राजापूरचे लोकप्रिय आमदार श्री. किरण तथा भय्याशेठ सामंत यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला श्रीराम मंदिर देवस्थानमध्ये हा ‘बाल आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भला मोठा चॉकलेट क्रीम केक कापून तो सर्व छोट्यांना वाटण्यात येईल.

टाइम्स स्पेशल

या ‘बाल आनंद मेळाव्या’त सहभागी होणार्‍या सर्व शाळांचा, शिक्षकांचा व कलावंतांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. हा ‘बाल आनंद मेळावा’ मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून ती पुढील प्रमाणे - १) श्री. राजन शेट्ये - अध्यक्ष २) श्री. विनायकराव हातखंबकर सर - समिती प्रमुख ३) श्री. रमाकांत पांचाळ सर ४) श्री. संदीप डोंगरे ५) श्री. संजय वैशंपायन ६) श्री. संतोष रेडीज ७) सौ. संजीवनी जामखेडकर मॅडम ८) श्री. दिपक राऊत ९) श्री. उपेंद्र सुर्वे १०) श्री. राकेश चव्हाण ११) श्री. भगवान मोटे सर १२) श्री. प्रकाश शिंदे १३) श्री. सुधाकरराव सावंत १४) श्री. दिपक देसाई १५) श्री. प्रदीप मोरे सर. या ‘बाल आनंद मेळाव्या’ला सर्व छोट्यांनी नटून थटून यावे तसेच येताना सोबत आपल्या पालकांना व घरातील मोठ्यांना आवर्जुन घेऊन यावे आणि नववर्षा निमित्त धमाल मौज मस्ती करुन आनंद व जल्लोष साजरा करावा असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg