loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गाची साईट पट्टी धोक्यात

खेड (दिलीप देवळेकर) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी ते भरणे नाका या दरम्यान एका खासगी टेलिकॉम कंपनीकडून नियमबाह्य पद्धतीने खोदकाम करण्यात आल्याने महामार्गाची साईट पट्टी अत्यंत धोकादायक बनली आहे. महामार्गालगत देण्यात आलेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन करून थेट साईट पट्टीवरच खोदाई सुरू केल्याचे गंभीर चित्र सध्या दिसून येत आहे. महामार्ग बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याशी संपर्क साधला असता, महामार्गालगत टेलिकॉम कंपनीला केबल टाकण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आर.ओ.डब्ल्यू.पासून निश्चित केलेल्या चार मीटर अंतरावरच खोदकाम करण्याची अट असताना, संबंधित कंपनीने अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या अवघ्या दोन मीटर, तर काही ठिकाणी सिमेंट रस्त्याला अगदी एक फुट अंतरावरच खोदकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महामार्गाची साईट पट्टी कमकुवत होऊन अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या २६ जानेवारी रोजी खेड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg