loader
Breaking News
Breaking News
Foto

आय.सी.एस.च्या प्राध्यापिकांनी बारामती येथे पूर्ण केला ए.आय.वरील एफ.डी.पी.

खेड – येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने बारामती येथील शारदाबाई पवार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे झालेल्या करियर कट्टा अंतर्गत ५ दिवसीय राज्यस्तरीय निवासी अधिवेशनात सहभाग घेतला होता. त्यात २ प्राध्यापिका व ३ विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य व उच्च तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र तसेच माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा अंतर्गत अधिवेशन एम.एस.एफ.डी.ए. (महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अँकॅडमी) यांनी डिझाइन केलेला पहिला एफ.डी.पी – 'ए.आय.फॉर टीचर्स' हा ५ दिवसीय कोर्स बारामती येथील शारदाबाई पवार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे आय.सी.एस. महाविद्यालयातील प्रा. लीना चिखले व प्रा. सुप्रिया काडगे यांनी यशस्वीरीत्या अ श्रेणी संपादन करून पूर्ण केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यशाबद्दल त्यांचे सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेरमन ऍड. आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच रत्नागिरी जिल्हा करियर कट्टा प्राचार्य प्रवर्तक प्रो. डॉ. अनिता आवटी, महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक डॉ. सी. आर. साळुंखे तसेच इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg