loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील प्रवाशांनो, इथे लक्ष द्या.. दिवा-सावंतवाडी गाडी लवकर सुटणार

रत्नागिरी (टाइम्स डेस्क) - कोकणातील प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असलेली दिवा-सावंतवाडी या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत मोठी अपडेट समोर आली असून १२ जानेवारी २०२६ पासून या गाडीच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे, याची माहिती कोकण व मुंबईतील चाकरमान्यांनी घ्यावी. मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणार्‍या या रेल्वे गाडीला दिवा व पनवेल स्थानकावर थांबा दिला जातो. सुधारीत वेळापत्रकानुसार १०१०५ डाऊन दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस ही पूर्वीप्रमाणे सकाळी ६.२५ वाजता निघणार नसून दहा ते पंधरा मिनिटे आधी म्हणजे सकाळी ६ ते ६.१५ दरम्यान दिवा स्थानकातून सुटेल. यामुळे प्रवाशांना पहाटेच दिवा जंक्शन रेल्वेस्थानकावर दाखल व्हावे लागणार आहे. याशिवाय पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, सिंधुदुर्ग या स्थानकांवर ही गाडी वेळेपूर्वी दहा ते पंधरा मिनिटे अगोदर पोहचणार आहे. त्यामुळे मुुंबई व कोकणातील प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. अन्यथा गाडी निघून जाईल आणि आपण स्थानकावरच थांबलेलो असू..

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg