loader
Breaking News
Breaking News
Foto

भाई गोवेकर, ममता वराडकर व नगरसेवकांचा भंडारी समाजाच्या वतीने सत्कार

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करा. मालवण पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असताना पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करा, समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे प्रतिपादन भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर यांनी येथे केले. सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालण व भंडारी ज्ञातीबांधव यांच्या वतीने मालवणच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा ममता वराडकर आणि नवनिर्वाचित नगरसेवकांसह विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या समाजातील मान्यवरांचा भव्य नागरी सत्कार सोहळा भरड येथील लीलांजली सभागृहात पार पडला. भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर यांच्या हस्ते हा मुख्य सत्कार करण्यात आला. यावेळी भंडारी समाजाचे अध्यक्ष रवींद्र मालवणकर, उद्योजक चंद्रशेखर मोर्वेकर, भाई सारंग, निलेश मांजरेकर, अविनाश मालवणकर, जयप्रकाश परुळेकर, निखिल वस्त आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यात नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक तपस्वी मयेकर, अश्विनी कांदळकर व भाग्यश्री मयेकर यांचा शाल, श्रीफळ आणि रोप देऊन गौरव करण्यात आला. समाजाच्या वतीने डास निर्मूलन, वाहतूक नियोजन, कचरा व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील व्यपाऱ्यांच्या सुविधा यांसारख्या शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. मालवण एलआयसी शाखेच्या शाखाधिकारी श्रीमती सतेजा बोवलेकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण शाखेने मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मालवण एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुदेश मयेकर यांचा सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्मचारी पतपेढीवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल सुमित मसुरकर यांनाही गौरविण्यात आले. नगराध्यक्षा वराडकर म्हणाल्या, समाजाने केलेल्या या सत्कारामुळे मी भारावून गेले आहे. जेव्हा समाजाला गरज लागेल, तेव्हा मी आणि माझे सहकारी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रसन्न मयेकर यांनी केले. सुनील नाईक यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला प्रदीप वेंगुर्लेकर, राजेंद्र आंबेरकर, पंकज पेडणेकर, भाऊ साळगावकर, अजित गवंडे, श्रीकांत वेंगुर्लेकर, देवदत्त हडकर, सागर हडकर, सचिन गवंडे, अशोक मयेकर, चिमाजी मसुरकर, बाळा सोन्सुरकर, पप्या कद्रेकर, मिलिंद झाड, विनोद बिले यांच्यासह बहुसंख्य भंडारी बांधव व भगिनी उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg