loader
Breaking News
Breaking News
Foto

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणाचा आदर्श; सापडलेला मोबाईल मालकाला परत करून माणुसकीचे उदाहरण

खेड (प्रतिनिधी) – माणुसकी आणि प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण देत रत्नदुर्ग रिक्षा संघटनेचे सल्लागार तसेच रिक्षाचालक प्रशांत दत्ताराम करजुळकर यांनी पुन्हा एकदा एक प्रामाणिक कृती करत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीप्रमाणे, प्रशांत करजुळकर हे पेशंट घेऊन लाइफ केअर हॉस्पिटलकडे गेले होते. परशुराम घाट चढून चिपळूणहून खेडच्या दिशेने येत असताना महामार्ग पोलिस चौकीच्या मागील बाजूस रस्त्यावर एक मोबाईल फोन पडलेला त्यांच्या निदर्शनास आला. गाडीतले भाडे सोडून त्यांनी हा मोबाईल उचलला आणि तो खेड पोलिस स्थानकात जमा करण्याचा निर्णय घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच वेळी त्या मोबाईलवर सतत फोन येत असल्याने कॉल उचलला असता मोबाईल मालकाचे नाव अनिल देवरुखकर असल्याचे समोर आले. ते खेड तालुक्यातील सवेणी येथील असून सध्या चिपळूण येथील नागरी पतसंस्थेत भरणे नाका येथे कार्यरत आहेत. माहिती मिळताच प्रशांत करजुळकर यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी मोबाईल फोन त्यांच्या ताब्यात परत केला. खेड तालुक्यातील वेरळ येथील रहिवासी असलेल्या प्रशांत करजुळकर यांनी यापूर्वीही अनेक वेळा प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे. रिक्षेमध्ये विसरलेले मोबाइल फोन, रोख रक्कम, दागिने, बॅगा यांसारख्या वस्तू त्यांनी त्यांच्या मूळ मालकांना न चुकता परत केल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे, १ जून २०२४ रोजी त्यांना रिक्षेत सापडलेले ८ हजार रुपये त्यांनी एका महिलेला परत करून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले होते. स्वतः प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून जात असूनही प्रामाणिकता न सोडता वेळोवेळी मिळालेल्या रकमा व मौल्यवान वस्तू मूळ मालकांना परत देत त्यांनी माणुसकीचा दर्जा उंचावला आहे. त्यांच्या या कृत्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg