loader
Breaking News
Breaking News
Foto

वावे जांभूळवाडीमध्ये बिबट्याची दहशत, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

खेड (दिलीप देवळेकर) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वावे जांभूळवाडीमध्ये रहिवाशी कु.कुणाल शंकर उतेकर यांच्या घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्या कैद झालेला दिसून आला. त्यामुळे वावे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढते जंगल तसेच बिबट्याला भक्ष्य मिळत नसल्याने कुत्री, मांजरे, गावातील गुरे खाण्यासाठी बिबट्या गावात येत आहे. काही दिवसापूर्वी काजू फाटा ते धामणंद रस्त्यावर वाहन चालकांना बिबट्या दिसला होता. दुचाकी वाहन चालक जीव मुठीत धरून रात्रीचा प्रवास करत आहेत. पंधरा गावातील नागरिकांमध्ये खूपच भीती निर्माण झाली आहे. शेतकरी शेती कामाला जाण्यासाठी घाबरत आहेत. सदरची घटना गावकर्‍यांनी वनखात्याच्या कर्मचार्‍यांना सांगितली. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. रात्री बाहेर फिरू नये. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg