loader
Breaking News
Breaking News
Foto

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायतउल्ला पटेल यांच्यावर चाकूने हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा गावात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायतउल्ला पटेल यांच्यावर चाकूने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने अचानकपणे पटेल यांच्यावर चाकूने वार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात हिदायतउल्ला पटेल गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.दरम्यान त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच अकोट पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास वेगाने सुरु केला आहे. घटनास्थळावरून काही पुरावे ताब्यात घेण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेही तपास सुरू आहे.दरम्यान, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट असून वैयक्तिक वाद, राजकीय वैमनस्य की अन्य काही कारण होते, याचा पोलीस तपास करत आहेत.या घटनेनंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत केदार पटेल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून लवकरच हल्लेखोराला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg