loader
Breaking News
Breaking News
Foto

​तिरोडा येथील मोबाईल टॉवर ८ दिवसांत सुरू करा, अन्यथा २६ जानेवारीला 'टॉवर आंदोलन'

सावंतवाडी (प्रतिनिधी) - तिरोडा (ता. सावंतवाडी) येथे गेल्या १० महिन्यांपूर्वी उभा राहिलेला मोबाईल टॉवर अद्यापही बंद अवस्थेत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. येत्या ८ दिवसांत हा टॉवर कार्यान्वित न झाल्यास २६ जानेवारी रोजी टॉवरवर चढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सागर नाणोसकर यांनी दूरसंचार कंपनीला दिला आहे. तिरोडा येथे मोबाईल टॉवरला सुमारे ५ वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. सततच्या पाठपुराव्यामुळे १० महिन्यांपूर्वी टॉवरचे काम पूर्ण होऊन तो उभा राहिला. मात्र, एवढा काळ लोटूनही हा टॉवर अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. याचा मोठा फटका तिरोडा, नाणोस आणि गुळदुवे येथील नागरिकांना बसत असून, या परिसरातील मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संदर्भात सागर नाणोसकर यांनी दूरसंचार कंपनीला निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की: ​टॉवरसाठी ग्रामस्थ सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. ​कंपनीचे अधिकारी केवळ वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत. ​टॉवर कार्यान्वित करण्याबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसत नाही.​ वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष होत असल्याने आता ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "पुढील ८ दिवसांत टॉवर सुरू न झाल्यास, प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) टॉवरवर चढून तीव्र आंदोलन केले जाईल," असा इशारा नाणोसकर यांनी दिला आहे. ​हे निवेदन देताना ठाकरे शिवसेनेचे शब्बीर मणीयार आणि आशिष सुभेदार उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

सागर नाणोसकर यांचा इशारा

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg