loader
Breaking News
Breaking News
Foto

कृषी महोत्सवात तिखट पदार्थाच्या स्पर्धा उत्साहात संपन्न

चिपळूण - चिपळूण सावरकर मैदानात सुरु असलेल्या कृषी व पशू प्रदर्शनात वाशिष्टीतर्फे तिखट पदार्थाच्या स्पर्धा आज शुक्रवारी उत्साहात संपन्न झाल्या. ४० महिलांनी या स्पर्धेत आपले नावीन्यपूर्ण तिखट पदार्थ सादर केले. त्याचे वाशिष्ठिच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांनी कौतुक केले. स्पर्धेसाठी एक तासाची वेळ होती. महिला स्पर्धकांनी पनीर बिर्याणी, कानकेचे मामोज, केक, शेवग्याच्या फुलांचे खुसखुशीत थालीपीठ, प्रोटीन, फायबरयुक्त मोड आलेल्या कडधान्याचे अपे, मटका पनीर बिर्याणी, सलादुग्ध शाही फ्लॅटर, चीजे पनीर व्हिजीज रोल, दही कबाब, मटार पनीर बॉल, मटार पनीर बॉल बीट रूट तिखी, एग्ज डेबिल असे विविध पौस्टिक तिखट पदार्थ तयार केले होते. या पदार्थाची चव, मांडणी, सजावट, स्वच्छता व नावीन्यता आदी बाबी परीक्षक अंजली केळकर व मीना पवार यांनी पहिल्या. सर्वच महिलांनी एका पेक्षा एक सरस तिखट पदार्थ बनविले होते. आजच्या सर्व स्पर्धकांना सौ. स्वप्ना यादव यांनी सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg