loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रत्नागिरीतर्फे जट निर्मूलन

रत्नागिरी - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रत्नागिरी तर्फे रत्नागिरी येथे राहणार्‍या श्रीमती पेजे यांचे केसाचे जट निर्मूलन करण्यात आले. कोविडदरम्यान श्रीमती पेजे यांचे पतीच्या निधनानंतर त्या दुःखात त्यांचे लांबसडक असणा-या केसांकडे खूपच दुर्लक्ष झाले. त्यामुळे केसांमध्ये जट निर्माण झाली. सदर जट ही देवीची जट आहे, असं लोकांनी सांगितल्यामुळे श्रीमती पेजे यांनी ती जट वाढू दिली. सदर जट खूपच वाढल्यामुळे त्यांना मानेचा व हात दुखण्याचा त्रास सुरू झाला. व झोपही न येण्याचा त्रास होऊ लागला. तसेच श्रीमती पेजे काम करत असलेल्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत संस्थेकडे तक्रारी केल्या. जट काढण्यासाठी श्रीमती पेजे यांनी ज्योतिषी तसेच मांत्रिक यांच्याशी संपर्क साधला. परंतु त्यांनी यासाठी २५००० रुपये खर्च येईल असे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी येथील स्वयंसेतू संस्थेच्या संस्थापक व समाजसेविका श्रद्धा कळंबटे व श्रीमती प्रभुदेसाई यांनी सदर महिलेचे प्रबोधन केलं व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तिला माहिती देऊन विनामूल्य तुझी जट काढून देतील असं सांगितलं. त्यानुसार रत्नागिरी येथे सदर महिलेचे घरी जट निर्मूलन ऍड. राधा वणजू यांनी केले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रत्नागिरी तर्फे विनोद वायंगणकर, मधुसूदन तावडे, वल्लभ वणजू उपस्थित होते. तसेच यावेळी श्रीमती श्रद्धा कळंबटे, श्रीमती प्रतिभा प्रभुदेसाई, श्रीमती भिडे व श्रीमती पेजे यांचे कुटुंबीय हे देखील उपस्थित होते. सर्व जट निर्मूलन झाल्यानंतर परिवारातील सर्वानी समाधान व्यक्त केले. कायम समाज परिवर्तनासाठी आग्रही असणारे शामराव उर्फ आण्णासाहेब पेजे यांच्यानंतरही पेजे परिवारातील सदस्य आजही सक्रीय पुढाकार घेवून कार्यरत आहेत हे एक उदाहरण उत्तमपणे दाखवून दिले. विकास पेजे आणि कुटुंबीय हा वारसा पुढे चालवत आहेत. त्याबदल संस्थेतर्फे आभार मानण्यात आले. रत्नागिरीतील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलेले चौथे जट निर्मूलन आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg