वेळणेश्वर (उमेश शिंदे) - वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित केला जाणारा भव्य सोहळा यशोत्सव २०२६ येत्या रविवारी, ११ जानेवारी २०२६ रोजी, आर.एम.एम.एस. हॉल, परळ, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य ट्रस्टच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त साधले जात असून, वैश्य समाजातील यशस्वी उद्योजकांचा गौरव आणि त्यांच्या सामाजिक योगदानाचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला आत्तापर्यंत ७०० वैश्य समाज बांधवांनी नाव नोंदणी केलेली आहे.
यशोत्सव २०२६ हा केवळ सन्मान सोहळा नसून, तो नेटवर्किंग, व्यवसायवृद्धी, रेफरल आणि नव्या संधींचा शोध यांसाठी एक प्रभावी मंच ठरणार आहे. तसेच उद्योजकता, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी या विषयांवर प्रेरणादायी सत्रेही आयोजित केली आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते प्रदीप लोखंडे, संतोष सकपाळ, दीपक शिंदे, आरती बनसोडे यांचे प्रेरणादायी विचार ऐकायला मिळणार आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संतोष कामेरकर यांच्या संकल्पनेने आणि पुढाकाराने वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची 2 वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आलेली आहे. संस्थेचे इतर विश्वस्त दीपक मेजारी, रूपाली तेलवणे, संजय भाट, चंद्रकांत खाडये, विष्णू सातवसे, मनोज आंग्रे यांचे देखील मार्गदर्शन याप्रसंगी मिळणार आहे.
याप्रसंगी उद्योगरत्न पुरस्काराने गिरीश कोळवणकर, प्रियांका प्रमोद गांधी, रुषाली सागर मोरये, राज साडविलकर, विनय पाताडे, विनायक धडाम आणि उद्योगश्री पुरस्काराने दयानंद माणगावकर, रामकृष्ण कोळवणकर, यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला समाजातील मान्यवर शालीग्राम खातु, संतोष भालेकर, भाई शेटये व नवनिर्वाचित वैश्य समाजातील सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. जगभरातील अनेक यशस्वी नामांकित उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट समाजातील एकता, प्रगती आणि सामाजिक उत्तरदायित्व यासाठी सतत कार्यरत असून, या सोहळ्याद्वारे समाजातील नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला नाव नोंदणी आवश्यक आहे. संपर्क अजित लाड - 9833037334

















































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.