loader
Breaking News
Breaking News
Foto

अस्तान नं. १ शाळेत अग्नीरहित स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन

खेड : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा अस्तान नं.1, खेड ता.खेड जि.रत्नागिरी येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत अग्नीरहित स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी भेळ, सँडविच, चना चटपटी, विविध प्रकारच्या भेळीचे प्रकार, ओरिओ बिस्कीट पासून पेढे, शेवपुरी, सरबत यासारखे पदार्थ बनवले. या उपक्रमाचे महत्त्व सांगताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वयंपाकाच्या कौशल्याचे महत्व पटवून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर उपक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक कार्ले, अर्चना पालकर, प्रशांत भालेराव व हेमंत राठोड उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंपाकाचे कौशल्य विकसित होण्यास मदत होईल, असे शिक्षकांनी म्हटले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg