loader
Breaking News
Breaking News
Foto

जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे मजगांवमध्ये रक्तदान शिबीर

कोर्लई (राजीव नेवासेकर) - श्री जगद्गुरु नरेंद्र महाराज नाणीज धाम (महाराष्ट्र) यांच्या प्रेरणेने आयोजित जीवनदान महाकुंभ -२०२६ उपक्रमात दि.४ जानेवारी ते दि. १८ जानेवारी दरवर्षी प्रमाणे १५ दिवस चालणाऱ्या या महाकुंभाद्वारे रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा महान उपक्रम संस्थानतर्फे राबविण्यात येत असून त्याचाच भाग तालुक्यातील मुरुड -मजगांव व साळाव मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच भाग या उपक्रमांतर्गत आज दि.७ जानेवारी रोजी मजगांव येथील कोळी समाज हॉलमध्ये जगद्गुरु नरेंद्र महाराज यांना वंदन करून मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.संजय पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मानसी महेश मोहिते, मजगांव आय टी आय महाविद्यालय प्राचार्य अझरुद्दीन उलडे, तालुका सेवा समिती अध्यक्ष अंकुश वाडकर,लोकीक पिसाट जितेंद्र पाटील,अनंत भगत, अंजली जगताप, किशोर भगत, उसरोली माजी सरपंच मनीष नांदगांवकर,रमेश दिवेकर, योगेंद्र गोयजी, डॉ.पटेल, सुधीर पूलेकर, संतोष चोरघे, बाबा डयला, निखिल पाटील, प्राची पाटील, मधूकर जासुद,भरत थिटे, अनिल नांदगांवकर, सुप्रिया म्हात्रे, सोनाली वाडेकर, मेधा कुलकर्णी, वेदश्री पाटील, वनविभागाचे शशिकांत आरोटे, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. पुणे येथील ओम ब्लड बँकेच्या डॉ.प्रियंका पाटील यांनी व त्यांच्या टिमने रक्त संकलन केले. यावेळी आजुबाजूच्या परिसरातील शेकडो रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg