loader
Breaking News
Breaking News
Foto

संजय गुंजाळ यांचा अलिबागच्या क्षात्रैक्य समाजातर्फे सन्मान

कोर्लई (राजीव नेवासेकर) - कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ यांना महाराष्ट्रराज्य सांस्कृतिक मंडळाचा सन 2025 चा कोकणरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अलिबाग येथील क्षात्रैक्य समाजाचे अध्यक्ष द्वारकानाथ उर्फ कबन नाईक यांनी मुरुडमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन महात्मा फुले पतसंस्थेच्या सभागृहात संजय गुंजाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन अजित गुरव व संचालक मनोहर गुरव, नवनिर्वाचित नगरसेवक आदेश दांडेकर, अनघा चौलकर, उदय दांडेकर, प्रवीण भायदे, चेअरमन अजित गुरव, मॅनेजर राकेश मसाल यावेळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

क्षात्रैक्य समाजाच्या अलिबाग कुरुळ येथील कै.नंदकुमार नाईक सभागृहात संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन व वधु-वर परिचय मेळावा रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दु. १.०० या वेळेत घेण्यात येणार असून समाजातील गुणवंतांचा गौरव करणे आणि त्याच्या उल्लेखनिय कामाची समाजाला ओळख करुन देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दीष्ट असून या भूमिकेतून संस्थेने वर्धापन दिनी कोकण रत्न पुरस्कार प्राप्त संजय गुंजाळ यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे व सदर कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे निमंत्रण यावेळी कबन नाईक यांनी गुंजाळ यांना दिले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg