loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'आंबा पिक छाटणी व व्यवस्थापन प्रशिक्षण'

वरवेली (गणेश किर्वे) - आंबा गुणवत्ता केंद्र (इंडो इस्राएल प्रकल्प) दापोली येथे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या दुसऱ्या बॅचसाठी दिनांक १५ व १६ जानेवारी रोजी वेळ: सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजे पर्यंत दोन दिवसांचे 'आंबा पिक छाटणी व व्यवस्थापन प्रशिक्षण' आयोजित करण्यात येत आहे. प्रशिक्षणामध्ये आंबा आदर्श पीक पद्धती, आंबा पुनरुज्जीवन, आंबा छाटणी व्यवस्थापन, आंबा घन लागवड, कीड, रोग, पाणी व्यवस्थापन, अभिवृद्धी, उद्यानविद्या प्रक्षेत्र व नर्सरी भेट, विद्यापीठ शेतकर्‍यांसाठी राबवत असलेले नवनवीन उपक्रम हे विषय राहतील. विविध व्याख्याने व प्रात्यक्षिके त्यामध्ये अंतर्भूत आहेत. प्रशिक्षणार्थींची राहण्याची व जेवण्याची सोय विद्यापीठामार्फत करण्यात येईल. प्रशिक्षणार्थींना त्यांचा प्रवास खर्च स्वतः करावा लागेल. बॅचमध्ये फक्त २५ मर्यादीत जागा आहेत. प्रशिक्षण यशस्वी रित्या पुर्ण करणाऱ्यास प्रमाणपत्र देण्यात येईल. नाममात्र नोंदणी शुल्क रु.१०० आगाऊ भरणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर ९४०४९९०७०१. येथे संपर्क साधावा असे डॉ. महेश मनमोहन कुळकर्णी, प्रकल्प प्रमुख, आंबा गुणवत्ता केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांनी कळविले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg