वरवेली (गणेश किर्वे) - दापोली तालुका तेली समाज आयोजित श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाज, (दापोली–खेड–मंडणगड) यांच्या संयुक्त विद्यमाने जय श्री संताजी महाराज जगनाडे चषक दापोली २०२६ (पर्व तिसरे) रत्नागिरी जिल्हास्तरीय मर्यादित षटकांची ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा कोकण कृषी विद्यापीठ, मैदान बुरोंडी नाका, दापोली येथे पार पडली. तेली प्रीमियर लीगचे उद्घाटन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मुंबई विभागाचे अध्यक्ष विलास त्र्यंबकर, श्री शनि कृपा हितवर्धक तेली समाज (दापोली खेड मंडणगड) अध्यक्ष डॉ. संदीप महाडिक, जय संताजी महाराज क्रीडा समिती दापोली अध्यक्ष, गिम्हवणे तंटामुक्ती समिती अध्यक्ष , माजी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद झगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त चिपळूण इलेव्हन संघाला रोख रुपये २५ हजार व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक महाकाल वॉरिअर्स, चिपळूण संघाला रुपये २० हजार व चषक, तृतीय क्रमांक प्राप्त दादा इलेव्हन, दापोली संघाला रुपये ११ हजार व चषक, चतुर्थ क्रमांक : स्वामी समर्थ इलेव्हन संघाला रुपये ७ हजार व चषक
तसेच वैयक्तिक पारितोषिक मध्ये उत्कृष्ट फलंदाज राजेश लांजेकर (दादा इलेव्हन, दापोली), उत्कृष्ट गोलंदाज : ओंकार खानविलकर (महाकाल वॉरिअर्स, चिपळूण), मालिकावीर अक्षय करळकर (चिपळूण इलेव्हन) यांना सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार, जिल्हा कार्याध्यक्ष दीपक राऊत, कोकण कृषी विद्यापीठ कुलसचिव सावर्डेकर, मुंबई विभाग महिला अध्यक्ष रोहिणी महाडिक, कोकण विभागीय महिला अध्यक्ष प्रियंका भोपाळकर, जिल्हाध्यक्ष श्रेया महाडिक, माजी जिल्हा परिषद सभापती रेश्मा झगडे, समीर महाडिक, श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाज (दापोली खेड मंडणगड) अध्यक्ष डॉ. संदीप महाडिक, जय संताजी महाराज क्रीडा समिती दापोली अध्यक्ष माजी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद झगडे, चिपळूण तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण राऊत, संगमेश्वर तालुका अध्यक्ष संतोष रहाटे, गुहागर तालुकाध्यक्ष प्रकाश झगडे, सचिव प्रवीण प्रकाश रहाटे, अशोक रहाटे, दिनेश खेडेकर , प्रवीण झगडे, समीर झगडे, राजेश झगडे, विनायक जाधव, अनंत भडकमकर, अमोल लांजेकर, काशिनाथ सकपाळ आदी मान्यवर तसेच दापोली, मंडणगड व खेड तालुक्यातील तेली समाज बांधव उपस्थित होते.









































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.