loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण दांडी येथील सौर पथदिव्यांचे लोकार्पण

मालवण (प्रतिनिधी) - मालवण दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिर ते दांडी शाळा या रस्त्यावर भाजपच्या मालवण नगरपालिकेतील गटनेत्या तथा नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर, माजी नगरसेविका सौ. सेजल परब तसेच भाजप उपतालुकाध्यक्ष सन्मेष परब यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या वैशिष्ट्‌यपूर्ण निधीमधून १९ सौर पथदिवे बसविण्यात आले असून गेली अनेक वर्षे अंधारात असणारा हा रस्ता प्रकाशमान झाला आहे. श्री देव दांडेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने हे काम पूर्णत्वास नेण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दांडेश्वर मंदिर ते दांडी शाळा या रस्त्यावर पथ दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी अंधारमय रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करावी लागत असल्याने गैरसोय होत होती. पर्यटनाच्या दृष्टीनेही हा रस्ता महत्वाचा ठरत असल्याने या मार्गावर पथ दिवे लावावेत अशी मागणी दांडी वासियांकडून होत होती. या मार्गावर सौर पथदिवे लावण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. या सौर पथदिव्यांचे लोकार्पण स्थानिक नागरिक गिरीधर आचरेकर व शरद आगवणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर, सौ. सेजल परब, सन्मेष परब आदी तसेच दांडी येथील नागरिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg