loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा लवकरच होणार ,पहिली बेल वाजली

मुंबई ; राज्यभरात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्याही हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यावेळी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुका जाहीर केल्या जाणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यात एकूण 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या आहेत. यापैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये आणि 88 पंचायत समित्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे सध्या आरक्षणाच्या मर्यादेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. पहिली बेल वाजली असून यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज होत आहे.

टाइम्स स्पेशल

सध्या जवळपास 29 जिल्ह्यांतील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा महापालिका निवडणुकांमध्ये गुंतलेली आहे. काही महापालिकांमध्ये निर्माण होणारी तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, अतिरिक्त अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महापालिका निवडणुकांनंतर घेण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, 31 जानेवारीपूर्वी या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, त्या पार्श्वभूमीवर निवडणुकांची घोषणा लवकरात लवकर होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. एकूणच, महापालिका निवडणुकांच्या धामधुमीतच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा कधी होते, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg