loader
Breaking News
Breaking News
Foto

रवीप्रभा मित्र मंडळाचा मोफत डोळे तपासणी शिबीर हा स्तुत्य उपक्रम'- पोलीस निरीक्षक पारखे

श्रीरविप्रभा मित्र संस्था, म्हसळा ,डोळ्यांचे दवाखाना म्हसळा व स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या चतुर्थ वर्धापनदिना निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबीर डोळ्यांचे हाॅस्पिटल , म्हसळा येथे आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे उपस्थित होते. तिमिरातून तेजाकडे या ब्रीदवाक्याप्रमाणेच संस्था अंधारातून प्रकाशाकडे नेणारे मोलाचे कार्य करीत आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. शिबीर प्रसंगी ३८ वर्षे निस्वार्थ सेवा करणारे नेत्र चिकित्सक डॉ. सलीम धलाईत यांना सर्वोत्कृष्ट जनसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिबिरात १०० हून अधिक लाभार्थ्यांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला. एस.टी. आगारातील चालक-वाहक कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष उद्धरकर यांनी केले. संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या परिश्रमातून हे शिबिर यशस्वी झाले असून, पुढेही असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमास नेत्रतज्ज्ञ डॉ. श्वेता अंबाडकर, संस्था उपाध्यक्ष नरेश विचारे, नेत्र चिकित्सक डॉ. नलिनी जाधव, डॉ. सलीम धलाईत, मिसेस धलाईत, रफिक चणेकर, बाबू बनकर, अनिल काप, पत्रकार शशिकांत शिर्के, म्हसळा एस.टी. कक्ष अधिकारी उदय मोरे, स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाचे कोकण अध्यक्ष संतोष मोरे, नंदकुमार चांदोरकर, नितेष पुरारकर, जयेश बेटकर, भिमराव सूर्यतळ, संतोष कुडेकर, मुकुंद बोर्ले, दवाखाना कर्मचारी उर्मिला म्हात्रे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव संतोष उद्धरकर यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी समीर लांजेकर, किशोर गुलगुले, संतोष घडशी, सुजित काते, सुशांत लाड, शांताराम निंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg