loader
Breaking News
Breaking News
Foto

घरडा कॉलेजच्या संदिप फेपडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

खेड- खेड तालुक्यातील नजीकच्या घरडा फाउंडेशन संचालित घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचारी व संगमेश्वर तालुक्यातील कोसुंबचे सुपुत्र संदिप फेपडे यांना नुकताच पूणे येथील शिव प्रतिष्ठान संस्थेतर्फे सामाजिक व शैक्षणिक योगदानाकरिता “समाज भूषण” या पुरस्काराने गौरविण्यात आले. तालुक्यातील घरडा फाउंडेशन या संस्थे मार्फत व घरडा इन्स्टीटयूट ऑफ टेक्ननाॅजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असणारे संदिप फेपडे हे गेली ३० वर्षे संस्थां मार्फत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. यामध्ये शेती विकास, सामाजिक विकासात्मक कार्य, आरोग्य जाणीव जागृती, शैक्षणिक उपक्रम यामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. या सामाजिक व शैक्षणिक कामाची दखल घेऊन पूणे येथील शिव प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांनी आळंदी येथे संदिप फेपडे यांचा समाज भूषण या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासमयी शिक्षणसम्राट रामकिशन रवंदळे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते रामचंद्र आवटे, शिव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मदन रेनगडे यांचेसह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर व पुरस्कार विजेते आणि संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg