loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूरच्या नगराध्यक्षांनी केली कोदवलीतील नवीन धरणाच्या कामाची पाहणी; गुणवत्ता राखण्याच्या सूचना

राजापूर (वार्ताहर): शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कोदवली येथील ब्रिटिशकालीन सायबाच्या धरणाच्या खालच्या बाजूला नव्याने बांधण्यात येत असलेल्या धरणाच्या कामाची पाहणी नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे यांनी केली. राजापूरवासियांना बारमाही मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी धरणाचे काम वेळेत पूर्ण करा आणि कामात गुणवत्ता राखा अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनासह ठेकेदाराला केल्या आहेत. या धरणाचे ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या नव्या धरणासाठी पूर्वी सौ.खलिफे यांनीच प्रयत्न केलेले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगराध्यक्षा खलिफे यांच्यासह नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव, स्वप्नील पडयार, दिवाकर खडपे, ठेकेदार गदगू जाधव आदि उपस्थित होते. सुमारे १४७ वर्षापूर्वी ब्रिटिशांनी कोदवली येथे बांधलेल्या सायबाचे धरण हाच राजापूर शहराचा मुख्य जलस्त्रोत राहिलेला आहे. या धरणातून विजेशिवाय नैसर्गिक दाबाने अखंडितपणे राजापूर शहराला पाणीपुरवठा होत आहे. जुने नादुरूस्त धरण, जीर्णावस्थेमुळे ठिकठिकाणी फुटलेली जलवाहिनी आणि साचलेला गाळ यामुळे धरणातून पाणीपुरवठा होण्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात शहराचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन जुन्या धरणाच्या खालच्या बाजूला नव्या धरणाची उभारणी केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

धरणाच्या झालेल्या कामाची नगराध्यक्ष खलिफे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांनी सद्यस्थितीमध्ये धरणाच्या झालेल्या कामाचा सविस्तरपणे आढावा घेतला. तर धरणाच्या उर्वरित राहिलेल्या कामांपैकी १७ गेटचे काम, एम-३० कॉंक्रिटचे काम, सीपीसीसी ट्रीटमेंट, पाईपलाईन टाकणे, धरणावर जाण्यासाठी कॉंक्रिट रस्ता, विद्युतीकरण करणे आदि कामांच्या अनुषंगाने न.प.प्रशासन आणि ठेकेदार यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली. धरणाचे शिल्लक राहिलेले काम वेळेमध्ये पूर्ण होताना कामाची योग्य प्रकारची गुणवत्ता राखण्याची सूचनाही त्यांनी प्रशासन व ठेकेदार यांना केली. नव्या कोदवली धरणाचे काम पूर्ण होऊन त्या धरणामध्ये पाणीसाठी झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून राजापूर शहराची कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर होईल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg