loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा वाढदिवस खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत साजरा

मालवण (प्रतिनिधी) - डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असतानाही केवळ दत्ता सामंत सारख्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. डॉक्टरांच्या औषधापेक्षा आपल्या सर्वांचे दर्शन घ्यावं, तुम्हाला भेटून, पाहुन जे समाधान लाभते ते कोणत्याही औषधाने मिळत नाही आणि म्हणून दत्ता सामंत यांच्या या वाढदिवसाला मी आवर्जून उपस्थित राहिलो आहे. सामंत यांना शुभेच्छा देताना त्यांच्या हातून अधिक समाजोपयोगी कार्य घडो, अशा सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी मालवण येथे बोलताना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण कुंभारमाठ येथे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा ५७ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत रात्रौ उशिरा पार पडला. यावेळी व्यासपीठावर निलम राणे, दत्ता सामंत, दीक्षा सामंत, विजयालक्ष्मी सामंत, दीपक परब, नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेवक दीपक पाटकर, संदीप कुडतरकर, उमेश नेरुरकर, बाळू कुबल, संजय पडते, संजय आंग्रे आधी व इतर उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, गुरूंचा आशीर्वाद पाठीशी असेल तर कोणी तुम्हाला अडवू शकत नाही, माझ्या पाठीशी नारायण राणे यांचा आशीर्वाद आहे. राणे यांची शिकवण आणि त्यांचे गुण मी आत्मसात केले आणि यशस्वी उद्योजक बनलो. त्यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी मी नेहमीच यशस्वीरित्या पार पडतो. नारायण राणे हा माझा ब्रँड आहे, यां ब्रँड वर मी ३५ वर्षे उभा आहे, राणे या नावावरच मी ३५ वर्षे काम करतोय, असे यावेळी दत्ता सामंत म्हणाले.

टाईम्स स्पेशल

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला काका कुडाळकर, नरसेवक पूनम चव्हाण, नीना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, अश्विनी कांदळकर, संग्राम साळसकर, विश्वास गांवकर, राजा गांवकर, महेश कांदळगावकर, राजू बिडये, संदेश शिरसाट, सुधीर साळसकर, अनिल कांदळकर पंकज वर्दम, मनमोहन वराडकर, सुनील घाडीगावकर, संग्राम साळसकर, आदी तसेच शिवसेना पदाधिकारी नगरसेवक तसेच शिवसैनिक दत्ता सामंत प्रेमी नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg