loader
Breaking News
Breaking News
Foto

किल्ले पारगड ते मोर्ले रस्ता काम ८ दिवसात सुरू न झाल्यास जि. प. व पं.स. निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

तिलारी (प्रतिनिधी) : ऐतिहासिक किल्ले पारगड ते मोर्ले या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले हे काम येत्या ८ दिवसांत प्रत्यक्ष सुरू न झाल्यास, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर पूर्णतः बहिष्कार टाकण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भातील लेखी निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून, "रस्ता नाही, तर मतदान नाही" अशी आक्रमक भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. किल्ले पारगड हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक वारसा असलेला भाग आहे. मात्र, मोर्ले ते पारगड या मार्गाची दयनीय अवस्था झाली असून, पावसाळ्यात तर हा रस्ता मृत्यूचा सापळा बनतो. यापूर्वी अनेकदा आंदोलने, उपोषणे आणि निवेदने देऊनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावच्या विकासासाठी आणि मूलभूत सोयींसाठी प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने, आता लोकशाहीतील सर्वात मोठ्या शस्त्राचा वापर करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. "आम्ही वर्षानुवर्षे फक्त आश्वासनेच ऐकत आहोत. जर ८ दिवसांत रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर पारगड आणि परिसरातील सर्व मतदार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालतील," असा इशारा रघुवीर शेलार व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गडावर येणाऱ्या शिवप्रेमींना आणि पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच, आजारी रुग्ण आणि शालेय विद्यार्थ्यांचेही मोठे हाल होत आहेत. या परिस्थितीला कंटाळूनच आता आरपारची लढाई लढण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. या इशाऱ्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

रस्ता नाही, तर मतदान नाही

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg