loader
Breaking News
Breaking News
Foto

युवक-युवतींना वाहक-चालक पदावर कंत्राटी पद्धतीने काम करण्याची संधी द्यावी - काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मिलिंद चाचे यांची मागणी

आबलोली (संदेश कदम) - रत्नागिरी परिवहन विभाग वाहक-चालक कर्मचारी कमतरता असल्यानेच रत्नागिरी जिल्ह्यातील युवक युवतींना कंत्राटी पद्धतीने वाहक - चालक पदावर काम द्यावे, अशी आग्रही मागणी गुहागर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात मिलिंद चाचे पुढे म्हणतात की, कोकण परिवहन विभागांमध्ये वाहक-चालक यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असून रत्नागिरी परिवहन आणि पालघर परिवहन विभागामधून गतवर्षामध्ये वाहक-चालक यांची बदली मोठ्या प्रमाणात होत असते आणि बदल्या झालेल्याही आहेत. या विभागाला काम करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिलिंद चाचे यांनी परिवहन मंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी पालघर परिवहन विभागामधील विरार आगार मधून विरार - भातगाव गाडीची मागणी विभाग नियंत्रक पालघर यांना केलेली असता पालघर विभागाने वाहक आणि चालक कमतरतेचे कारण पुढे केले असून वाहक-चालक यांची बदली झाली असल्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये एसटी बस सोडणे शक्य नाही. ही अडचण पाहता गुहागर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद चाचे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील युवक - युवतींना वाहक-चालक पदावर कंत्राटी पद्धतीने काम द्यावे. त्यामुळे युवक - युवतींना रोजगारही मिळेल आणि महामंडळाचे कामही सुरळीत चालेल, असेही मिलिंद चाचे यांनी या निवेदनात नमूद केलेले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg