loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा तलाठी कार्यालयाशेजारी उभारण्यात येणाऱ्या आपत्ती निवारण इमारतीचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) - बांदा तलाठी कार्यालयाच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या आपत्ती निवारण इमारतीचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. ही महत्वाकांक्षी इमारत MSRDA (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) यांच्या माध्यमातून उभारण्यात येत असून, यासाठी बांदा भारतीय जनता पार्टीने सातत्याने मागणी लावून धरली होती. नैसर्गिक आपत्ती, पूरस्थिती, वादळ, आग लागणे तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत मिळावी, यासाठी ही आपत्ती निवारण इमारत उपयुक्त ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या इमारतीमुळे आपत्कालीन प्रसंगी मदतकार्य अधिक वेगाने व प्रभावीपणे राबवता येणार असून प्रशासनाच्या कामकाजालाही मोठी चालना मिळणार आहे. भूमिपूजनप्रसंगी बोलताना माजी सभापती शीतल राऊळ यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. आपत्तीच्या काळात आवश्यक यंत्रणा, मनुष्यबळ आणि साधनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे असून, ही इमारत त्या दृष्टीने बांदा परिसरासाठी अत्यंत महत्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. बांदा भाजपच्या पाठपुराव्यामुळे हा महत्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात साकारत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

टाइम्स स्पेशल

यावेळी प्रांतिक सदस्य शाम काणेकर, जिल्ह्याध्यक्ष श्वेता कोरगावकर, मंडळ तालुकाध्यक्ष स्वागत नाटेकर, माजी सभापती शीतल राऊळ, उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, सरपंच प्रियांका नाईक, माजी सरपंच अशोक सावंत, दादू कविटकर, महिला तालुकाध्यक्ष रुपाली शिरसाट, बांदा शहराध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, बांदा सोशल मीडिया प्रमुख विराज परब, देवलं येडवे, तनुजा वराडकर, सिद्धेश पावसकर, शक्तिकेंद्र प्रमुख मनोज कल्याणकर, बूथ अध्यक्ष अक्षय परब, राकेश केसरकर, सिद्धेश महाजन, सचिन काणेकर, विजय बांदेकर, स्वप्नील जाधव, जगन्नाथ सातोसकर, शैलेश केसरकर, आपा धामापूरकर, साई कल्याणकर, वालेतीन आल्मेडा, राजु वाळके, तसेच तलाठी फिरोज खान, महेश गोवेकर, हरिचंद्र साळगावकर आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg